झुक झुक अगिन गाडी| धुरांच्या रेषा हवेत काढी| पळती गाडी पाहूया| मामाच्या गावाला जाऊया| राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून इंदापूरकर रेल्वेच्या प्रतीक्षेत! !
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे
काल्पनिक छायाचित्र
इंदापूर दि. सन २०१४ पासून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेऊन त्यावर तालुक्यात अगदी गल्ली बोळात देखील विकासाची कामे सुरू केली .अगदी ब्रिटिश काळापासून इंदापूर शहरात पुणे महानगर पालिका असल्यापासून इंदापूर नगरपालिका अस्तित्वात आहे. इंदापूर तालुक्याची भौगोलिक रचना फार वेगळी आहे. इंदापूर तालुक्यात निरा भीमा नद्या आहेत. इंदापूर तालुक्यात १४६ खेडी आहेत. गावागावात एक तरी तलाव किंवा तळे आहे. इंदापूर तालुक्यात अगोदर वालचंद इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी परिसरात रेल्वे होती.इंदापूर अनेक साखर कारखाने आहेत.इंदापूर तालुक्यात अनेक इंडस्ट्रीज आहेत.इंदापूर तालुक्याचे पूर्व पश्चिम व दक्षिण उत्तर अंतर खूप मोठे आहे.इंदापूर तालुका हा पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असून पुणे जिह्याच्या पूर्वेस शेवटचा तालुका आहे. इंदापूर तालुका भीमा व नीरा नदीच्या परिसरात आहे. पौराणिक काळात इंदापूरचे नांव इंद्रपुरी असे होते. तालुक्याचा भाग पूर्वी मालोजीराजे भोसले यांचे जहागिरीमध्ये समाविष्ट होता. इंदापूर हे तालुक्याचे मुख्यालय असून त्या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये आहेत. इंदापूर तालुक्यामधून पुणे-हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ जात असून इंदापूर-पुणे हे अंतर १३५ कि. मी. आहे.
तालुक्याचे उत्तर सीमेवर भीमा नदी वाहत असून दक्षिणेस नीरा नदी आहे. भीमा नदीवर सुप्रसिद्ध उजनी धरण असून जलाशयात २२ गावे बुडाली आहेत.. धरणाच्या पाण्याचा फुगवटा सुमारे ५० कि. मी. असून त्या पाण्याचा उपयोग कृषिविकास व मत्स्यपालनासाठी होत आहे. तालुक्यातील भीमा व नीरा दोन नद्या, धरणाच्या पाण्याचा फुगवटा व नीरा कालवा यामुळे बहुतांशी भाग बागायती असून तालुक्याचा मध्यभागच्या पठारावरील भाग हा जिरायती आहे. प्रमुख व्यवसाय शेती असून ऊस हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इंदापूर तालुक्यात सहकारी तत्त्वावर तीन साखर कारखाने आहेत. सर्वात जुना श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर असून त्यानंतर इंदापूर सहकारी आत्ताचा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना, महात्मा फुले नगर बिजवडी व त्यानंतर नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना, शहाजीनगर हा आहे. तसेच एक खाजगी साखर कारखाना एक व खाजगी गुळाचा कारखाना आहे.
इंदापूर तालुक्यात शेतीसाठी प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या एकूण ३०५ सोसायट्या कार्यरत आहेत.इंदापूर तालुक्यात एकूण ११५ ग्रामपंचायती आहेत.
इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांचे सेवेत अग्रक्रमी काम करणारी कृषि उत्पन्न बाजार समिती, इंदापूर कार्यरत आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व कृषि उत्पन्न बाजार समिती, इंदापूर यांचे संयुक्त विद्यामाने शेतमाल निर्यात सुविधा केंद्र कार्यरत आहे. या सुवीधा केंद्रामधून केळी, डाळींब द्राक्षे निर्यात केली जातात.या तालुक्यात डाळिंब,द्राक्षे,ढोबळी मिरची,टोमॅटो,व इतर सर्व पिके घेतली जातात.
कालठण नं १ येथे उजनी जलाशयात सी फ्लाय होणार असल्याचे संकेत खासदार सौ.सुप्रिया सुळे यांनी दिले होते.
इंदापूर तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दोन मस्त्य बाजारपेठा आहेत. एक म्हणजे इंदापूर तर दुसरी म्हणजे भिगवण त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र इंदापूर हे मस्त्य व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे.
इंदापूर तालुक्यातील भिगवण , वालचंद नगर ,जंक्शन, निमगाव केतकी, बावडा, भवानीनगर, कळस आदी ठिकाणी व्यावसायिक दृष्ट्या प्रगत तंत्रज्ञान व समृद्ध आहेत.
तरंगवाडी येथील सोनाई दूध संघ हा महाराष्ट्रातील सर्वात दूध प्रकल्प आहे. तसेच कळस येथील नेचर दूध संघ हा देखील इंदापूर तालुक्यातील दुसरा सर्वात मोठा प्रकल्प आहे. भिगवण ते तरडगाव हा उजनी धरणाचा बॅक वॉटर परिसर आहे.या परिसरात एम.टी.डी.सी. ने पर्यटन केंद्र विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे भविष्यात बॅक वॉटर पार्क मोठे होणार आहे.
इंदापूर तालुक्याला सातारा, अहमदनगर व सोलापूर जिल्हा सीमा लागून आहेत.त्यामुळे इंदापूर तालुका एकीकडे मराठवाडा तर दुसरीकडे सह्याद्री पर्वत रांगा आहेत. त्यामुळे इंदापूर तालुका हा दळण वळणाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे.
इंदापूर तालुक्यात निरा- नरसिंहपूर हे फार प्राचीन तीर्थक्षेत्र मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले कुलदैवत म्हणून विकसित केले आहे. पळसनाथ हे देखील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
एकंदर या सर्व पार्श्वभूमीवरून इंदापूर तालुक्यात रेल्वे सेवा असणे गरजेचे असल्याचे मत इंदापूरकरांनी मांडले. तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे विकास कामांचा आढावा व वेग पाहता इंदापूर कर राज्यमंत्र्यांकडून रेल्वेची अपेक्षा धरत आहेत.
वालचंदनगर साखर कारखाना रेल्वे
वालचंदनगर येथे १९३३-३४ मध्ये कळंब साखर कारखाना सुरू झाला. कारखाना आणि मुख्य लाईन दरम्यानची रेल्वे c.1941 वापरात आली. मुख्य मार्गाचा मायलेज सुमारे २२ मैल (३५ किमी) होता आणि उसाच्या ओळींसह एकूण मायलेज सुमारे ३४ मैल (५४ किमी) होते.नोंदी दर्शवतात की या साइटला १९२३ पासून 2ft 6in/762mm नॅरो गेज (NG) लोकोमोटिव्हचा पुरवठा करण्यात आला होता. IIS महायुद्धात कारखाना ‘वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड’ झाला. ही रेल्वे आता इतिहास जमा झाली आहे.
इंदापूर तालुक्यातील भिगवण गावातून रेल्वे जात असली तरी तालुक्यातून शहर किंवा ग्रामीण परिसरातून रेल्वे जाणे आवश्यक आहे.
बातमीतील फोटो कोकण रेल्वे इंदापूर येथील आहे.