अबब! टेंभुर्णी नाक्यावरील एका डाळिंबाची किंमत चक्क २०लाख ५६ हजार रुपये! चौक सुशोभीकरण भाग१

इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क

दि.१९ मे : श्री.क्षेत्र निरा – नरसिंहपूर विकास आराखडा रा.मा. इंदापूर अकलूज सांगोला रस्ता सुधारणा कामाकरीता आवश्यक असणाऱ्या विद्युत लाईन स्थलांतरित ,नादुरुस्त पाणीपुरवठा लाईन दुरुस्त व पुनरटाकणी करणे तसेच चौक सुशोभीकरण करणे आदी कामांसाठी राज्यशासनाकडून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून शासन निर्णय क्र. २०१६/३/प्र. क्र २०२/पर्यटन दि.१६ नोव्हेंबर २०१६ अन्वये या कामांना पुणे जिल्हा कार्यालयाकडून मान्यता प्राप्त होऊन दि.१४ नोव्हेंबर २०१९ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मंजुरी मिळाली .

सदरची कामे २ कोटी ६७ लाख २१ हजाराची कामे आहेत.मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.आणि कामांना सुरुवात करण्यात आली होती.

यामध्ये इंदापूर अकलूज सांगोला विद्युत लाईनचे स्थलांतर करणे या कामाअंतर्गत सुमारे ८७ लाख ६२ हजाराची कामे करण्यात आली आहे. तर इंदापूर अकलूज सांगोला रस्त्यावर चौक सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे १ कोटी ६८लाख २७ हजारांची कामे करण्यात आली.इंदापूर अकलूज सांगोला रस्त्यावर चौक सुशोभीकरण करण्यात आले आहे.यामध्ये १कोटी ६८लाख २७हजाराची कामे करण्यात आली आहे.

इंदापूर अकलूज सांगोला रस्त्यावर टेंभुर्णी नाक्यावर २० लाख ५६ हजार रुपयाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या सुशोभीकरणासाठी प्रतिकृती म्हणून २०लाख ५६ हजार रुपयांचे एक डाळिंब बसविण्यात आले आहे.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा डाळिंब कोणत्या ठेकेदार अथवा कोणत्या कन्स्ट्रक्शन कंपनीकडून बसिवण्यात आले आहे याचा उल्लेख नाही.तसेच ते किती रुपयांचे आहे. याचाही उल्लेख नाही. इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता किशोर साळुंखे यांना याबाबत विचारले असता काम पूर्ण झाले आहे आता कशाला विचारणा करता असे सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!