ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ इंदापूर तालुक्यात कडकडीत बंद!
इंदापूर तालुक्यात कडकडीत बंद.
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.२५ : बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला इंदापूर तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे तालुक्यात ठीक -ठिकाणी सर्वत्र बंद पाळण्यात आला.तर इंदापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. इंदापूर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाजार पेठा बंद होत्या.
ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शानाखाली दि.२५ मे २०२२ रोजी भारत बंद पुकारण्यात आला होता. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.