मुस्लिम समाजाने पुकारलेल्या इंदापूर बंदला १०० टक्के प्रतिसाद
शिवाजी शिंदे इंदापूर प्रतिनिधी चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि. १० : इंदापूर|: नुपुर शर्मा व नविन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी दि.१० रोजी इंदापूर शहरात मुस्लिम समाजाकडून दर्गा मस्जिद चौक ते इंदापूर प्रशासकीय भवन असा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे,पोलीस निरीक्षक तय्युब मुजावर यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर आज इंदापूर बंद ठेवण्यात आले.इंदापूर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळपासूनच गावातील दुकाने बंद ठेवून इंदापूरकरांनी बंदचे सहकार्य केले. शहरात कडकडाट बंद होता. मुस्लिम समाजाने प्रथमच बंद ठेवला होता. सर्व मुस्लिम बांधवांनी इंदापूरकरांचे धन्यवाद मानले.