छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त इंदापूर शहरातून महाराजांच्या प्रतिमेची सवाद्य भव्य मिरवणूक
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क,
इंदापूर चक्रव्यूह प्रतिनिधी शिवाजी शिंदे
इंदापूर: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४८व्या जयंतीनिमित्त इंदापूर शहरातून भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ठीक ठिकाणी करण्यात आले.दि.२६ जून ते ३० २०२२ दरम्यान युगप्रवर्तक श्री. शाहू बहुउद्देशिय सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दि. २६ जून रोजी मा.राज्यमंत्री श्री. दत्तात्रेय भरणे व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप गारटकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.तर बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. राहुल मखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी श्री.भरणे यांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य अखंड भारतासाठी दिशादर्शक आहे. लोकसेवेच्या माध्यमातून त्यांनी शिवरायांचे स्वराज्य टिकवले. तर श्री. गारटकर म्हणाले की, महापुरुषांची नाळ आपण विविध कार्यातून जपली पाहिजे, तसेच महापुरुषांचा वसा आणि वारसा घेऊन गेला पाहिजे तसेच त्यांचे जे कार्य करीत आहेत त्यांना मदत केली पाहिजे.यावेळी मा. नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, इंदापूर तालुकाध्यक्ष रा. काँ.पा.श्री.हनुमंत कोकाटे,इंदापूर शहराध्यक्ष श्री. बाळासाहेब ढवळे ॲड.श्री.शुभम निंबाळकर ,युवानेते मयूर ढावरे परमेश्वर मखरे निखिल बाब्रस आदी उपस्थित होते.
दि. ३० जून रोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. मुकुंद शहा, नगरसेविका सौ. राजश्री मखरे, मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे, ज्येष्ठ नेते हमीद अतार, प्रा. महादेव चव्हाण मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. ललेंद्र शिंदे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.शिवाजी शिंदे, कार्याध्यक्ष श्री.संतोष जामदार सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब आडसुळ, राजू गुळीक, अगंद मखरे, आदी उपस्थित होते.
दि. ३० जून रोजी श्री. मुकुंद शहा म्हणाले की, लोकराजांची जयंती साजरी होणे म्हणजे आनंदोस्तव होय. छत्रपती शाहू महाराजांनी तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहचवले.
इंदापूर शहरातून महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक हमीद अतार,प्रा. महादेव चव्हाण ,दिलीप शिंदे आदी ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते. ठीक ठिकाणी महाराजांच्या मिरवणुकीचे स्वागत तर प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आर. पी.आय(निकाळजे गट) तालुकाध्यक्ष श्री. शिवराज (पप्पू)पवार पवार सोनू ढावरे , व आर पी.आयचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.पो. काँ. महादेव जाधव व त्यांचे सहकारी आदींच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज राजमाता अहिल्या होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. पोलिस श्री. तुषार ढावरे ॲड. सूरज मखरे, प्रा. सुहास मखरे, प्रा. रणजित मखरे, प्रशांत मखरे, सुरेश मखरे, नागेश शिंदे, रोहित शिंदे, श्री. अमित ढावरे, ओंकार कांबळे, उत्कर्ष मखरे, दीपक कांबळे, खंडुभैया मखरे, श्री.संतोष मखरे,नंदू खंडाळे, दत्तू ढोबळे आदी तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व डॉ. अण्णाभाऊ साठे वाचनालय येथील सर्व विद्यार्थी उपस्थित होते व मान्यवर उपस्थित होते.
भव्य तोफांच्या सलामीने आसमंत दणाणून व उजळून निघाले होते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष श्री.उत्तम गायकवाड, सचिव सुहास शेवाळे, खजिनदार अन्वर मणियार, सदस्य प्रवीण राऊत, संतोष जामदार, आदी उपस्थित होते. उर्वरित कार्यक्रम लवकर होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री. शिवाजी शिंदे यांनी सांगितले.