उजनी ६३.६८ टक्के तर गेल्यावर्षी आजच्या तारखेला २.३६ टक्के होते!
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क: इंदापूर दि. २३: उजनी धरण वेगाने १०० टक्क्याकडे वाटचाल करताना दिसून येत आहे , जर ह्या पाण्याचा विसर्ग असाच सुरू राहिला तर जुलै अखेर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याचा अंदाज जलतद्यांचा आहे. परंतु पाऊस असाच सुरू राहिला तर व पाण्याचा विसर्ग सुरू राहिला तर पुराची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याची गरज आहे.