रीपाईचा खंदा समर्थक व शिलेदार हरवला! हनुमंत साठे यांच्या जाण्याने मोठी पोकळी – परशुराम वाडेकर
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
पुणे इंदापुर: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा. हनुमंत साठे यांचे मंगळवार दि.१३ सप्टेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास हृदयविकाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर बुधवारी दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वा. धनकवडी स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मूळचे बार्शी जिल्हा सोलापूरचे असलेले हनुमंत साठे गेल्या अनेक वर्षांपासून रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री खा. रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्त्वाखाली दलित अन्याय अत्याचारविरोधात संघर्ष केला. मातंग समाजाच्या विविध प्रश्न व समस्यांवर संघर्षपूर्ण लढे दिले. राज्यभर आंदोलन, मेळावे आणि अधिवेशनांच्या माध्यमातून हजारो मातंग समाजातील कार्यकर्त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोबत जोडले. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळींसोबत सर्व पक्षीय नेत्यांसोबत त्यांची मैत्री होती. त्यांच्या निधनामुळे एक लढवय्या, संघर्षशील नेता हरपला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या कृती व स्मृतीस विनम्र अभिवादन