माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडुन आमदार महेश लांडगेंचे सांत्वन
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क शिवाजी शिंदे
दि२८: माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज आमदार महेश लांडगे यांचे सांत्वन केले.भोसरी येथील भाजप आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले होते,या निमित्ताने श्री.भरणे यांनी भोसरी येथील निवासस्थानी लांडगे कुटूंबीयांची भेट घेतली.
यावेळी अभिवादन करत असताना श्री.भरणे म्हणाले की,लांडगे कुटुंबियांशी आमचे पहिल्यापासून जिव्हाळ्याचे संबंध असून कै.हिराबाई किसनराव लांडगे एक आदर्श माता म्हणून सर्वत्र परिचीत होत्या.त्यांची शिस्त आणि काटेकोर बाणा हा वाखाणण्याजोगे होता.तसेच त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये नेहमीच अग्रेसर असायच्या,त्यांच्या जाण्याने सर्वांना अतिशय दुःख झाले आहे.आपण निश्चितपणे एका आदर्श मातेला मुकलो असून या निमित्ताने लांडगे कुटूंबीयांची अपरिमित हानी झाली असल्याचे सांगत श्री.भरणे यांनी आदरांजली अर्पण केली.