जुन्या भांडणाचा राग मनात धरुन महिलेची धारदार शस्त्राने हत्या
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क इंदापूर प्रतिनिधी
दिनांक ११: लाकडी (ता. इंदापूर) येथील महिलेचा जुन्या भांडणाचा राग मनात धरुन धारदार शस्त्राने वार करून खुन करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.१० ऑक्टोबर रोजी इंदापूर तालुक्यातील लाकडी येथे सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास जुन्या किरकोळ भांडणाच्या वादातून महिलेचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण पणे हत्या करण्यात आला. याबाबत वालचंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी राजेंद्र रामचंद्र जराड (रा. उदमाईवाडी ता. इंदापूर जि. पुणे) याने मागील आठवड्यातील जुन्या भांडणाच्या कारणावरून मयत रूपाली शेखर काटे (रा. लाकडी ता. इंदापूर जि. पुणे) हिचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला, असल्याची फिर्याद मयत रूपाली काटे हिचा भाऊ ललेंद्र शिंदे रा. इंदापूर यांनी दिली.
याबाबत वालचंदनगर पोलिस ठाण्यात आरोपी राजेंद्र रामचंद्र जराड याच्यावर खून तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारित कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी घटनास्थळी बारामतीचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे तसेच वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातूरे पोहोचले.
खून केल्यानंतर आरोपीचाही आत्महत्याचा प्रयत्न…
खून केल्यानंतर आरोपी राजेंद्र जराड यानेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याने त्याच्यावर बारामती येथील खाजगी रुग्णालयात पोलिसांच्या देखरेखी खाली उपचार चालू आहेत.