मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांचा वाढदिवस विविध उपक्रम,आरोग्य तपासणी ,रक्तदान शिबिराने संपन्न
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
शिवाजी शिंदे
इंदापूर प्रतिनिधी: मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम , आरोग्य तपासणी, उपचार व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन दादासाहेब सोनवणे मित्र परिवार आणि श्री.प्रदिपदादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे मातोश्री रमाई आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आले होते.यावेळी श्री गारटकर म्हणाले की, समाजामध्ये कार्यकर्ता महत्वाचा आहे, कार्यकर्ता असेल तर समाज घडेल, समाजातील सच्च्या कार्यकर्त्याकडे नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. काही लोक जात, धर्म, यांच्या नावाखाली समाजातील तरुणांना भडकवत असतात अश्या लोकांपासून सावध राहावे असा सावधानतेचा इशारा त्यांनी दिला. यावेळी नेता उत्तम दर्जाचा कसा असावा यासाठी दिवंगत आर.पी.आय नेते हनुमंत साठे व कै. अरुण ढावरे यांची उदाहरणे दिली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन दादासाहेब सोनवणे मित्र परिवार आणि प्रदिपदादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे मातोश्री रमाई आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
यावेळी श्री गारटकर म्हणाले की, समाजामध्ये कार्यकर्ता महत्वाचा आहे, कार्यकर्ता असेल तर समाज घडेल, समाजातील सच्च्या कार्यकर्त्याला नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. काही लोक जात, धर्म, यांच्या नावाखाली समाजातील तरुणांना भडकवत असतात अश्या लोकांपासून सावध राहावे असा सावधानतेचा इशारा त्यांनी दिला. यावेळी समाजातील तळागाळातील लोकांसाठी नेता उत्तम दर्जाचा कसा असावा यासाठी दिवंगत आर. पी.आय नेते हनुमंत साठे व कै.अरुण ढावरे यांची उदाहरणे दिली. मा.नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे यांनी मा. दादासाहेब सोनवणे यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी नेते संजय सोनवणे यांनी वाढदिसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
इम्रान शेख, निखिल बाब्रस, प्रवीण ननवरे, वसीम बागवान, अहमेदरजा सय्यद आणि विशाल जगताप उपस्थित होते.यावेळी समाजातील विधवा परित्तक्या , अनाथ वृध्दांना कपडे व साड्या , दिवाळीचा फराळ वाटप श्री.प्रदीप गारटकर व अप्पा ननवरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुक्ताई ब्लड बँकेतर्फे ५० रक्तदात्यांचे ब्लड संकलित करण्यात आले. आणि रक्तदात्यांना भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात केले.