गोर- गरीब जनतेला केंद्रबिंदू मानून काम करण्याची आदरणीय पवार साहेबांची शिकवण- मा.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

चक्रव्यूह न्यूज नेटवर्क

अक्षय कांबळे प्रतिनिधी

अजोती(इंदापूर): ग्रामपंचायत अजोती – दि.२२: सुगाव येथील २१ कोटी ५५लाखांच्या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे व मा.मंत्री दत्तात्रेय भरणे यांचे हस्ते झाले.

यावेळी खासदार सौ.सुळे यांचे जोरदार भाषण झाले.त्यानंतर श्री.भरणे म्हणाले यांनी आपल्या भाषणात गावकऱ्यांनी यथोचित सन्मान केला त्याबद्दल आभार मानले. कै.कालिदास दरदरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पुढे ते म्हणाले की, मी कायम आमदार व मंत्री राहील असा कोणी ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आला नाही.फक्त संधीचे सोने कसे करायचे व त्याचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी कसा करायचा हे ओळखावे.खोटे नाटे सांगून लोकांची दिशा भुल करायची नाही हे करण्यापेक्षा घरी बसलेलं बरं पण हे पाप आपण करणार नाही असेही ते म्हणाले.कोरोनाच्या काळात एक चहाची पुडी देखील जनतेला विरोधकांनी मदत म्हणून दिली नाही. सुखाच्या काळात सगळेच सोबत असतात पण जे दुःखाच्या काळात जे सोबत नसतात ती कसली माणसे!असे म्हणत भरणे यांनी मा. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला.

...आणि भरणे यांनी साक्षीचे केले कौतुक!

साक्षी व्यवहारे हिने केलेल्या भाषणाचे कौतुक भरणे यांनी  केले. भाषण गावच्या चर्चेचा विषय बनला. तिने अतिशय सुंदर पद्धतीने भाषण केले.ती म्हणाली की, गावातील अनेक कामकाजाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे आता मामांनी केलेल्या रस्त्यांमुळे आमचे शालेय जीवन सुरळीत झाले आहे. असेही तिने आपल्या भाषणात सांगितले.

आपल्या भाषणात ते असे म्हणाले की, भरणेवाडी पलीकडच्या भवानीनगर गावातील मोठ्या लोकांची कामे केली आणि एखादे कामे केले नाही तर मोठी लोकं वाकडे दाखवतात याउलट गोर गरीब जनतेचे काम केले तर ते आपल्याला मरेपर्यंत विसरत नाही.म्हणूनच  गोरगरीब , मागासवर्गीय , मच्छीमार करणारे लोक यांना केंद्र बिंदू मानून काम करण्याची शिकवण आदरणीय पवार साहेबांनी दिली.

पुढे ते म्हणाले की,शेतकऱ्याच्या उसाला चांगल्या प्रकारचा दर दिला जाईल आणि तेही एक रकमी. नाहीतर काही कारखानदारी करणारे हप्त्या- हप्त्याने पैसे  देऊन शेतकऱ्यांची अडवणूक करतात तसा प्रकार राष्ट्रवादीकडून होणार नाही. याबाबत खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.या भागातील उसाचे एक टीपरू शिल्लक राहणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली.

यानंतर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी मच्छीमारी करणाऱ्या बांधवांना त्यांनी योजना संदर्भात व व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच मच्छीमारी हा व्यवसाय जागतिक पातळीवर जाण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पवार साहेबांनी उजनी फेडरेशन साठी ५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता त्याच आठवड्यात हे सरकार बदलले आणि तो प्रोजेक्ट बारगळला याचे दुःख त्यांनी व्यक्त केले.

यानंतर मा.बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले .अजोती गावचे सरपंच संजय दरदरे यांनी प्रास्ताविक केले.यानंतर कार्यक्रमाचा समारोप केला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!