इंदापूर तालक्यातील २६ ग्रामपचायतींचे निवडणुकांचे पडघम डिसेंबरमध्ये वाजणार!

चक्रव्यूह न्यूज नेटवर्क

शिवाजी शिंदे प्रतिनिधी

इंदापूर: सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला यापुढील निवडणुकांमध्ये मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन पुढील निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या निवडणुकांमधून वगळलेल्या पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे.राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता थेट सरपंचांची निवड जनतेतून करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील निवडणूक जाहीर झाल्याने इंदापुरातील २६ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत. कार्यकर्त्यांची आता खूप पळापळ होणार आहे.  जुळवाजुळव सुरू झाली असून त्यात अनेक जण आपल्या मनात सरपंच होण्याचे स्वप्न उरी बाळगत आहे.

ग्रामपंचायतीची नावे:

१)पडस्थळ २)मदनवाडी ३)माळवाडी ४) रणमोडवाडी ५)डाळज नं. २ ६)लाखेवाडी ७)बिजवडी. ८)थोरातवाडी ९)जांब   १०)बोरी   ११)न्हावी   १२)हिंगणगांव

१३)झगडेवाडी १४) रेडणी १५)डाळज नं. ३ १६)बेलवाडी १७)डाळज नं. १  १८)कळाशी  १९)कुरवली  २०) म्हासोबाचीवाडी २१)मानकरवाडी २२) डिकसळ

२३ )अजोती २४) सराटी २५) पिंपरी खु. २६) गंगावळण

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे

•तहसीलदारांकडून १८ नोव्हेंबरला निवडणुकीची नोटिस प्रसिद्ध केली जाणार आहे.

•उमेदवारी अर्ज २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत भरता येणार आहे.

•प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी ५ डिसेंबरला होणार असून उमेदवारी अर्ज ७ डिसेंबरपर्यंत मागे घेण्याची मुदत आहे.

•निवडणूक चिन्ह ७ डिसेंबरला दिली जाणार असून १८

डिसेंबरला मतदान होणार आहे.

• मतमोजणी २० डिसेंबरला होणार असून २३ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!