आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पुर्वतयारीसाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’कडून तालुकानिहाय निरीक्षकांची नियुक्ती

नाशिक (चक्रव्यूह वृत्तसेवा) – आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पुर्वतयारीसाठी व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकावार घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षण शिबिरांच्या तयारीसाठी व पक्षाच्या विविध कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तालुकावार निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अध्यक्षतेखालील ॲड.रविंद्र पगार यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

लवकरच हे निरीक्षक आपल्याला नेमून दिलेल्या तालुक्यात जातील व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन पुढील कार्यक्रमांचे नियोजन करतील असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी म्हटले आहे.

तालुकावार निरीक्षक पुढील प्रमाणे-:

येवला तालुका / निफाड पूर्व तालुका- दिलीप खैरे, डॉ. योगेश गोसावी,

नांदगाव तालुका- बाळासाहेब कर्डक,

मालेगाव पूर्व तालुका- अंबादास खैरे,

नांदगाव शहर- ज्ञानेश्वर शेवाळे,

मनमाड शहर- भाऊसाहेब भवर, कैलास मुदलियार,

चांदवड तालुका- समाधान जेजुरकर,

देवळा तालुका- यु.के.आहेर,

दिंडोरी तालुका- जगदीश पवार,

पेठ तालुका- विजय पवार, गोकुळ झिरवाळ,कळवण तालुका- रघुनाथ आहेर, बबन शिंदे,

सुरगाणा तालुका- आबासाहेब देशमुख,

बागलाण तालुका- उमेश खातळे, विलास सानप,

निफाड तालुका- सुनिल कबाडे, राजेंद्र जाधव,

मालेगाव तालुका- राजाराम मुरकुटे, सोमनाथ खातळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!