पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात २६ ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदासाठी २४६ अर्ज; तर इतर २४६ जागांसाठी ९५६ अर्ज.
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
इंदापूर: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात २६ ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदासाठी २४६ अर्ज; तर इतर २४६ जागांसाठी ९५६ अर्ज दाखल झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी सदस्य व सरपंच पदासाठी एकूण ६ हजार १५७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात सदस्यपदांसाठी ५ हजार १०७, तर सरपंच पदासांठी १ हजार ५० अर्ज आले आहेत.
इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमधील २४६ जागांसाठी सर्वाधिक ९५६ अर्ज आले.- इंदापूर तालुक्यातच सरपंचपदांसाठी सर्वाधिक १६१ अर्ज आले आहेत. येथे २६ ग्रामपंचायती आहे, तर सर्वांत कमी ३८ अर्ज मुळशीतीलीच ११ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी आले आहेत.