नगरसेवक कैलास कदम हे अहिल्या रत्न पुरस्काराने सन्मानित
इंदापूर प्रतिनिधी
इंदापूर नगरपरिषदचे नगरसेवक तथा गटनेते कैलास कदम यांना राजकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी व लोकोपयोगी उपक्रम राबविलेबद्दल ‘अहिल्यारत्न’पुरस्कार देऊन सन्मानित केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती इंदापूर तालुका यांचेवतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘अहिल्यारत्न’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक पांडुरंग मारकड यांचे मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे अध्यक्ष महेंद्र रेडके,निमंत्रक नानासाहेब खरात,संदीप रेडके, गणेश शिंगाडे,समाधान रेडके आदींनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
यावेळी इंदापूर नगरपरिषदचे नगरसेवक गटनेते कैलास कदम यांना राजकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी व लोकोपयोगी उपक्रम राबविलेबद्दल ‘अहिल्यारत्न’पुरस्कार देऊन सन्मानित केले.