जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या वतीने१०वीच्या विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित,
प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल,
विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी
लाखेवाडी( बावडा) :दिनांक ०६/०६/२०२३ रोजी इयत्ता १०वी २०२३मधील इंदापूर, माळशिरस, माढा तालुक्यातील २७शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी याठिकाणी आयोजित करण्यात आला. विद्येची आराध्य देवता सरस्वती पूजनाने सुरुवात करून
संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर व चित्रलेखा ढोले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयीचे अनुकरण करून मृगजळाच्या मागे न धावता,परिस्थितीचे भान ठेवून आपल्या आयुष्याची नवी सुरुवात होत असून निश्चित मार्ग निवडावे,भविष्यामध्ये अशाच चांगल्याप्रकारे यश संपादन करून, चांगले डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी घडून आपल्या परिसराचे नाव उज्वल करून, आपल्या आई-वडीलांची मान उंचवावी,आपल्या शाळेचे नाव उज्वल करून,देशाची, समाजाची चांगली सेवा करावी असे सांगण्यात आले.
यामध्ये विद्यानिकेतन स्कूल अँड वज्युनिअर कॉलेज लाखेवाडी,भांडगाव महाविद्यालय,पिंपरी बु। महाविद्यालय, शिवपार्वती नरसिंहपूर महाविद्यालय,हनुमान विद्यालय अवसरी,निमसाखर महाविद्यालय, बाभूळगाव महाविद्यालय,बोराटवाडी महाविद्यालय,चैतन्य महाविद्यालय नरसिंहपूर,वसंतदादा पाटील महाविद्यालय निरवांगी,गिरवी महाविद्यालय,गोतोंडी महाविद्यालय,वरकुटे खुर्द महाविद्यालय,रेडा महाविद्यालय,अनंतराव पवार निरनिंमगाव महाविद्यालय,फोंडशीरस महाविद्यालय,सराफवाडी महाविद्यालय,पळसमंडळ महाविद्यालय,वालचंदनगर महाविद्यालय ,एस.बी. पाटील बावडा महाविद्यालय,शेटफळहवेली महाविद्यालय, हनुमान विद्यालय बावडा, शंभू महादेव दगडवाडी,सराटी महाविद्यालय,काटेश्वर विद्यालय काटी, भोडणी महाविद्यालय,एस. बी. पाटील. वनगळी इ. महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. व पालकांचे कौतूक करण्यात आले.
यावेळी जय भवानीगड विकास प्रतिष्ठान ,लाखेवाडी संस्थेचे अध्यक्ष तथा मा.सदस्य जि.प.पुणे श्रीमंत ढोले सर,लाखेवाडी गावच्या विद्यमान सरपंच चित्रलेखा ढोले मॅडम,संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे सर ,संस्थेचे प्रमुख प्रमुख सल्लागार प्रदीप गुरव सर,संस्थेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पवार सर,संस्थेचे मुख्याध्यापक राजेंद्र सरगर सर,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य . डॉ.सम्राट खेडकर सर यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.व कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. खेडकर सर व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत गुरव सर यांनी केले.