ग्रामदैवत सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ह.चांदशाहवली बाबांचा ४५९ वा उरूस उत्साहात साजरा

इंदापूर (प्रतिनिधी):

ग्रामदैवत सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान .हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ह.चांदशाहवली बाबांचा ४५९वा उरूस आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी इंदापूर नगरीतील हजारो भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.

बुधवार दि.२० डिसेंबर २०२३ रोजी गल्लफ व शेरा घेऊन उरुसाची सुरुवात शाही संदल मिरवणुकीने करण्यात आली. २१ डिसें २०२३ रोजी उरूस व २२ डिसेंबर २०२३ अखेर झेंडा अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे.

 पाचशे वर्षाच्या अखंडीत परंपरेकडे ही वाटचाल आहे.

कुठलाही जातीभेद ,धर्मभेद न करता परंपरा टिकवणे ही अवघड बाब असते परंतु इंदापूर नगरीतील नागरिकांनी ही अखंडीत टिकवली आहे.

 बाबांना वाहिला जाणारा मानाचा गल्लफ व शेरा याचा मान इंदापूर पोलिस ठाण्याकडे परंपरेने चालत आलेला आहे. सालाबाद प्रमाणे पोलीस ठाण्याकडून गल्लफ व शेरा बाबांच्या दरबारी अर्पण करण्यात आला.परंपरेनुसार संदल बनवून बाबांच्या दरबारी घेऊन जाण्याचा मानाचा हक्क आत्तार घराण्याकडे जातो. ज्येष्ठ समाजसेवक हमीदभाई आत्तार आजही अनेक वर्ष हा रीतिरिवाज जपत आहे. स्वतः संदल घेऊन त्यांनी बाबांच्या दरबारात घेऊन निघाले.

 उरुसाच्या पहिल्या दिवशी इंदापूर पोलीस ठाण्याकडून सायं.७.००वा मानाचा शेरा वाजत गाजत शहरातून नेहरू चौक हमीद आत्तार यांच्या घराजवळ येऊन थांबतो आणि संदल घेऊन दर्ग्याजवळ मिरवणुकीची सांगता होते. त्यानंतर समस्थ गावकरी व बाबांचे भक्त यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी ११.०० वा.विधिवत फातेव्हखानी होऊन संपन्न झाला.

 यावेळी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे, प्रकाश माने, महिला पोलिस उपनिरीक्षक अपर्णा जाधव,महिला पोलिस हवालदार बिडवे मॅडम, खंडागळे मॅडम,भोंग मॅडम, अमोल गायकवाड, पोलीस हवालदार रासकर हवालदार काळे व कर्मचारी वर्गाचे उपस्थितीत मानाचा गल्लफ व फुलांचा मानाचा शेरा बाबांचे मजार वर अर्पण केल्यानंतरच उरूसास सुरुवात होते . तसेच हाजी मुनीर कुरेशी व बन्सी भंडलकर यांना झेंड्याचा मान आहे.

यावेळी उरूस कमिटीचे अध्यक्ष आझाद पठाण, उपाध्यक्ष महादेव चव्हाण सर, प्रमुख मानकरी हमीद आत्तार, ट्रस्टी महमूद मुजावर,मुनीर मुजावर, हाजी मुनीर कुरेशी , बन्सी भंडलकर अजुम पठाण, अल्तमस शेख, अमीन पठाण,सलमान पठाण, अन्सार शेख,मुनीर पठाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!