स्वाभिमानी कट्ट्याच्या फेसबुक व यू ट्यूबचे लोकार्पण
● इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुका स्वाभिमानी पत्रकार संघातर्फे स्थापन करण्यात आलेल्या ‘स्वाभिमानी कट्टा’ च्या फेसबुक पेज व युट्यूबचे लोकार्पण माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, प्रगतशील व्यावसायिक मुकुंद शहा व स्वाभिमानी पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काटे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२३) करण्यात आले.
स्वाभिमानी पत्रकार संघाची स्थापना झाल्यानंतर या संघात अनेक दैनिके, वृत्तवाहिन्या, साप्ताहिकांचे संपादक व युट्युब, पोर्टल चे पत्रकार सामील झाले. संघाच्या सदस्यांच्या विचारविनिमयातून ‘स्वाभिमानी कट्टा’ ची स्थापना करण्यात आली. कट्ट्याच्या माध्यमातून सामाजिक, राजकिय, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक,क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींना आमंत्रित करण्यात येणार आहे. त्यांच्याशी संघटनेतील पत्रकार सदस्य समाजहिताच्या दृष्टीने साधक-बाधक चर्चा करणार आहेत. यावेळी मान्यवरांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागणार आहे.
समाजहिताच्या गोष्टी, माहिती आणि घडामोडी वाचक, प्रेक्षक व नागरिकांपर्यंत सहजरित्या व जलद गतीने पोहोचवण्यासाठी ‘स्वाभिमानी कट्टा’ या नावाने फेसबुक पेज व युट्यूब चॅनेल तयार करण्यात आलेले आहे. नामवंतांच्या घेतलेल्या मुलाखती व चर्चासत्रे फेसबुक व युट्यूबवर पहावयास मिळणार आहेत. स्वाभिमानी कट्ट्याच्या फेसबुक पेजची लिंक https://www.facebook.com/swabhimanikatta व युट्यूब चॅनेलची लिंक https://www.youtube.com/@SwabhimaniKatta ही आहे. स्वाभिमानी पत्रकार संघाच्या सर्व अपडेट्स त्वरित मिळण्यासाठी फेसबुक पेजला लाईक तर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करण्याचे आवाहन इंदापूर तालुका स्वाभिमानी पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.