संकटाच्या काळात भरत शहा यांनी शरद पवार साहेबांची साथ सोडली नाही – राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष( एस.पी)मेहबूब शेख

श्री. भरत शेठ शहा दही हंडी चषकाने मोडला गर्दीचा विक्रम

मोठ्या संख्येने महिला भगिनींनी नोंदवला सहभाग

इंदापूर (प्रतिनिधी ): भरत शेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दही हंडी चषक मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षणाचे केंद्र सिने अभिनेत्री मानसी नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांचे नृत्य आ आविष्कार ठरले. हजारो नागरिकांची गर्दी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.तर तिरंगा दहीहंडी संघ यंदाच्या वर्षी भरत शेठ शहा चषकाचे मानकरी ठरले.

यावेळी गोपालांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले की, संकटाच्या काळात भरत शहा यांनी आपल्याला साथ दिली. त्यांनी पवार साहेबांना मोलाची साथ सहयोग केला. त्यामुळे मला त्यांचा अभिमान आहे.

प्रत्येक संघाने तीन – तीन मनोरे रचून देखील लवकर दहीहंडी फोडता आली नाही . कारण जास्त असलेली उंची. अखेर तिसऱ्या प्रयत्नात इंदापूर शहरातील तिरंगा दहीहंडी संघाने सात थर रचून दहीहंडी फोडण्याचा मान आपल्या नावावर केला.

इंदापूर शहरातील जुन्या बाजार समितीच्या मैदानात गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी भरत शेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने ही दहीहंडी आयोजित करण्यात आली होती. यावेळी सिने अभिनेत्री मानसी नाईक व रशियन कलाकार यांनी इंदापूर करांची मने जिंकली.

यावेळी दहीहंडी उत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, अकलूजचे सरपंच शिवबाबा मोहिते पाटील, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव विधीज्ञ राहुल मखरे, राष्ट्रवादीचे अमोल भिसे, तालुकाध्यक्ष विधीज्ञ तेजसिंह पाटील, आरपीआयचे शिवाजीराव मखरे, संदीपान कडवळे, नगराध्यक्षा अंकिता शहा, वैशाली शहा, रुचिरा अंगद शहा, शहा ग्लोबल स्कुलचे व्यवस्थापक अंगद शहा व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महात्मा फुले दहीहंडी संघ, तिरंगा दहीहंडी संघ, शिवशंभो दहीहंडी संघ, नेताजी दहीहंडी संघ, छत्रपती शिवाजी दहीहंडी, स्वराज्य दहीहंडी संघ यांनी सहभाग घेतला होता. त्या सर्व संघाना सलामीला भरत शहा मित्र परिवाराच्या वतीने सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी नंदकुमार गुजर, डॉ.संजय शहा, डॉ. श्रेणिक शहा, संजय दोशी, गणेश महाजन, विधीज्ञ राकेश शुक्ल, विलास माने, रामकृष्ण मोरे, रवी सरडे, विधीज्ञ आशुतोष भोसले, आनंद केकाण, पोपट पवार, अंकुश माने, विनायक बाब्रस, गजानन गवळी, संदीप पाटील, शकील सय्यद, फिरोज पठाण, बिल्डर मोहसीन शेख, प्रशांत उंबरे, निखिल महाजन, श्रीकांत माने, रश्मी शेख, उमेश ढावरे व भरत शहा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी उपस्थित गोपाळ भक्तांना, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी शुभेच्छा दिल्या, तर इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा व शहा परिवाराचे सर्वेसर्वा मुकुंद शहा यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!