वंचित बहुजन युवा आघाडीच्या प्रयत्नांना यश, इंदापूर पोलिसांकडून अवैद्य धंद्यांवर तातडीने कारवाईला सुरवात …!

इंदापूर (प्रतिनिधी) – मागील काही दिवसात इंदापूर तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही अवैध धंदे सुरू होते यामुळे अनेक कष्टकरी कुटुंब उध्वस्त होत चालली होती. तसेच अनेक शाळकरी विद्यार्थी देखील व्यसनाधीन होऊ लागली होते यावर कोणीच लक्ष द्यायला तयार नव्हते. दारू मध्ये उध्वस्त झालेले कुटुंबीय हळहळ व्यक्त करत होते.

यावर उपाययोजना व्हावी यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी इंदापूर तालुका कार्यकारिणीने यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत या धंद्यांवर कारवाई होण्याकरता पुढाकार घेतला व २९ सप्टेंबर रोजी इंदापूर पोलीस स्टेशन येथे जाऊन तसेच वालचंद नगर पोलीस स्टेशन भिगवण पोलीस स्टेशन व बावडा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वच अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन युवा आघाडी तालुकाध्यक्ष किर्तीकुमार वाघमारे यांनी व त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीने केली होती. या मागणीची दखल घेत इंदापूर पोलीस स्टेशनने कारवाई सुरुवात करत अनेक अवैध गुटका धंद्यावर छापा टाकत व्यवसायिकांवर कारवाई केली व इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध गुटका व्यवसायिकांवर गुन्हे दाखल करून घेतले.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष कीर्तीकुमार वाघमारे यांनी सांगितले की जरीअवैध धंद्यांवरती कारवाई सुरू झाली असली तरी जोपर्यंत हे अवैध धंदे पूर्णपणे बंद होत नाहीत तोपर्यंत हा लढा चालूच ठेवणार आहे व इंदापूर तालुका अवैध धंदे मुक्त करणार आहे अशी माहिती दिली.

यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी तालुका अध्यक्ष किर्तीकुमार वाघमारे, उपाध्यक्ष उमेश मोरे व गणेश जाधव, तालुका महासचिव सोमनाथ खानेवाले व तालुका संघटक समीर सय्यद यांनी निवेदन सादर केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!