रणधुमाळी: इंदापूर विधानसभेची संपूर्ण माहिती पहा एका क्लिक मध्ये!
इंदापूर( प्रतिनिधी): पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका हा राज्याच्याच नव्हे तर देशाच्या पटलावर सतत चर्चेत असतो.
येत्या नोव्हेंबर २०२४ मध्ये आगामी विधानसभा होऊ घातली आहे.
१)आजमितीला इंदापूर तालुक्यात २०२४ रोजी ३ लाख ३६ हजार ६४३ इतके मतदार आहे.
२)यापैकी १ लाख ७२ हजार १८७ पुरुष मतदार आहेत तर
महिला मतदार – १ लाख ६३ हजार १७ इतक्या आहेत.
इंदापूर तालुक्यात एकूण ३)पोलिंग स्टेशन ३३७ आहेत.
४)प्रशासनाच्या सोयीसाठी, इंदापूर तालुक्याचे १ शहर आणि १४३ गावांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
५)इंदापूर शहराची लोकसंख्या २०२४ मध्ये ३६ हजार इतकी आहे.
६)इंदापूर तालुक्यात मागासवर्गीय लोकसंख्या जवळ जवळ ८५ हजाराच्या आसपास आहे.त्यामुळे त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या १५% आहे.
७)तर अनुसूचित जमाती लोकसंख्या ६ हजाराच्या आसपास आहे.
*धर्मनिहाय लोकसंख्या*
बाबतीत विचार केला तर
१)हिंदू धर्मियांची लोकसंख्या जास्त आहे. म्हणजेच ती जवळ जवळ ३ लाख ५५ हजार ७०५(२०११च्या जन गणनेनुसर) ९२.८३% टक्के इतकी आहे.
२)तर त्यानंतर मुस्लिम धर्मीयांचा नंबर लागतो.त्यांची एकूण लोकसंख्या १८ हजार ६३७ इतकी आहे.(२०११च्या जन गणनेनुसार)
३)त्यानंतर तालुक्यात तिसरा नंबर बौद्ध धर्मीयांचा लागतो. त्यांची लोकसंख्या ५ हजार २३१ इतकी आहे.
४)यानंतर तालुक्यात जैन धर्मीय २ हजार ५०० च्या आसपास आहेत.
५)तर अनुक्रमे ख्रिश्चन ३०० तर शीख धर्मीय १०० च्या आसपास आहेत .
६)परंतु विशेष बाब म्हणजे तालुक्यात कोणताही धर्म नसलेली माणसे ही १ हजार २५२ एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात आहे.
क्रमशः भाग १
पुढील भागात बरच काही विधानसभेविषयी
सदरची माहिती संकलित व अंदाजे स्वरूपात आहे. यामध्ये कदाचित बदल असू शकतो.