प्रवीण माने यांना मिळणार चहाची किटली ?
इंदापूर(प्रतिनिधी): इंदापूर विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे , तशी तशी त्याला रंगत येत आहे.
इंदापूर भले ३८ उमेदवार जरी उभे असले तरी खऱ्या अर्थाने सामना हा तिरंगीच होणार यात तीळमात्र शंका नाही!
दोन आजी माजी आमदार यांना घड्याळ आणि तुतारी अशी चिन्हे प्राप्त झाली असून तिसरे अपक्ष व लढतीचे उमेदवार प्रवीण माने यांना निवडणूक आयोगाकडून किटली चिन्ह मिळेल अशी चर्चा जनतेतून व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
प्रवीण माने यांचा प्रचार सुसाट वेगाने चालला आहे. याचीच प्रचिती म्हणून प्रवीण माने यांनी इंदापूर शहरात खडकपुरा येथे दत्त मंदिराशेजारी असलेल्या बाबू मोरे यांच्या चहाच्या स्टॉलवर भेट देऊन चहाची किटली हाती घेतली आणि त्यांनी चहाचा आनंद घेतला. सोशल मीडिया वर त्यांचा हा फोटो व्हायरल मोठ्या प्रमाणात झाला आहे. माने यांना किटली मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
परंतु निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रवीण माने यांना किटली, कपाट किंवा सफरचंद यापैकी कोणतेही चिन्ह मिळू शकते.