ॲड. राहुल मखरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटात राज्यप्रमुख, कार्यकर्ते प्रशिक्षकपदी म्हणून निवड!
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांच्या महाराष्ट्र प्रदेशात महत्त्वाची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. ॲड. राहुल रत्नाकर मखरे यांची राज्यप्रमुख, कार्यकर्ते प्रशिक्षण विभाग या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत जयवंत शिंदे यांनी अधिकृत पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली.
या पत्रात शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे की, “पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आपण दिलेले योगदान लक्षात घेऊन ही जबाबदारी सोपवण्यात येत आहे. पक्षाचे विचार आणि श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांचे धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा आहे.”
या नियुक्तीबद्दल ॲड.राहुल मखरे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या प्रशिक्षण विभागाला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.