हर्षवर्धन पाटील यांच्या कोपरखळीने अजित पवारांच्या टीकेला जशास तसे उत्तर

 इंदापूर( प्रतिनिधी):राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या दिवशी अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती . नामदार अजित पवारांच्या या टीकेला हर्षवर्धन काय उत्तर देणार ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते.यावेळी प्रचारादरम्यान त्यांनी माध्यमांसमोर या टीकेला उत्तर देताना म्हणाले की, अजितदादा पवार महाराष्ट्रातील फार मोठे नेते आहेत .कुठल्याही सभेत काहीही बोलण्याची त्यांना परवानगी आहे.कोणाबद्दलही बोलतात.इंदापुरात आल्यावर माझ्यावरच भाषण असतं. त्याशिवाय भाषण पूर्ण होत नाही.मला तर आनंद झाला.आता इंदापुरात गावागावात सभा घ्या अन् टीका करत रहा.आधी माझी त्यांना विनंती आहे असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांचा अजित पवारांना चिमटा काढला आणि कोपरखळी देखील मारली.मी काही दलबदलू कार्यकर्ता नाही. ज्या ज्या वेळेस जनता भूमिका घेते त्या त्या वेळेस मी निर्णय घेतो.जनतेच्या आग्रहाखातर आपण भाजपमधून २०१९ ची निवडणूक लढवली.

परंतु महाराष्ट्र वाचवण्यासाठी आपण पवार साहेबांना साथ दिली पाहिजे हा ही आग्रह जनतेनेच केला म्हणूनच आपण प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.

मी असा काही पहाटे उठून जात नाही.आमचा कारभार हा जनतेमध्ये असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!