अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी संतोष आटोळे

इंदापूर ता.०४ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्याच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी दैनिक सकाळचे इंदापूर प्रतिनिधी संतोष आटोळे यांची तर सोशल मीडिया अध्यक्षपदी धनंजय कळमकर व सचिवपदी लोणी देवकर येथील सकाळचे प्रतिनिधी संदीप बल्लाळ यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ व इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघ यांची वार्षिक आढावा इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष डॉ.संदेश शहा यांच्या उपस्थितीत आयोजित या आढावा बैठकीत तालुका अध्यक्षपदी संतोष आटोळे, उपाध्यक्षपदी रामदास पवार, सचिव पदी संदीप बल्लाळ, सहसचिव पदी अंगद तावरे तर सदस्यपदी नाना घळके यांची निवड करण्यात आली. तर सोशल मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी धनंजय कळमकर यांची उपाध्यक्षपदी नीलकंठ भोंग तर सदस्य पदी आदित्य बोराटे, विशाल भोंग, प्रवीण पिसे, अक्षय यादव, आसिफ शेख यांची तर माहिती व जनसंपर्क पदी राम वर्मा आसबे यांची निवड करण्यात आली. तर पुणे जिल्हा कार्यकारणीवर कार्याध्यक्ष पदी मनोहर चांदणे तर संघटक पदी राजेंद्र कवडे देशमुख, सुरेश जकाते, काकासाहेब मांढरे, कैलास पवार, जिल्हा निरीक्षक पदी शौकत तांबोळी यांनी निवड करण्यात आली. यावेळी मागील वर्षभराचा जिल्हास्तरीय कामाचा आढावा डॉ.संदेश शहा यांनी तर तालुकास्तरीय कामाचा आढावा राजेंद्र कवडे देशमुख यांनी मांडला. यावेळी मोहम्मद तांबोळी, हमीद आतार यांचेसह अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन धनंजय दुनाखे यांनी, प्रास्ताविक काकासाहेब मांढरे यांनी तर आभार नूतन अध्यक्ष संतोष आटोळे यांनी मानले. — छायाचित्र – इंदापूर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!