इंदापूर शहरातील जि .प.प्राथमिक शाळा नं ४ व६ मध्येआनंदी बाजार आणि खाऊ गल्ली उपक्रम संपन्न
इंदापूर( प्रतिनिधी):इंदापूर तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदापूर नंबर ४ व ६ मध्ये विद्यार्थ्यांना खरेदी विक्री तसेच व्यवहार ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासाठी शनिवारी दिनांक ११ जानेवारी रोजी आनंदी बाजार आणि खाऊ गल्ली उपक्रम घेण्यात आला.
आनंदी बाजार उपक्रमात विद्यार्थ्यांनी आठवडे बाजार भरवला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मकर संक्रात आणि भोगी सणासाठी लागणारे पदार्थ, पालेभाज्या, फळभाज्या ,फळे, बिस्किटे, खाऊचे पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते या आनंदी बाजाराला चांगला प्रतिसाद लाभला बाजारात सुमारे ५ हजार रुपयांची उलाढाल झाली.
बाजाराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ .गौरी मखरे आणि सौ. वैशाली जामदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम, माळी महासंघ अध्यक्ष श्री विकास शिंदे ,सामाजिक कार्यकर्ते संतोष जामदार, सुनील जाधव ,भारत जामदार, गणेश अडसूळ , पालक वर्ग उपस्थित होते. बाजाराचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री वासुदेव पालवे सर ,श्री विलास शिंदे सर, श्री सुरेश लोंढे सर, श्री विकास घुगे सर सौ वैजयंता घुगे मॅडम यांनी केले.