भरत शहा यांना इंदापूरातील युवकांचे मोठे पाठबळ!विरोधकांनी घेतली धास्ती!
इंदापूर(प्रतिनिधी):कालच्या १० डिसेंबरला भरत शहा यांचा वाढदिवस अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला.त्याचीच प्रचिती म्हणून इंदापूर शहरात चौका चौकात लागलेले त्यांना शुभेच्छा देणारे फलक !आणि त्यावरील असलेला शुभेच्छुक मोठा युवा वर्ग!हाच युवा वर्ग आणि भरत शहा इंदापूर शहरासह तालुक्यात चर्चेचा विषय बनले आहेत.
काही जाणकार मंडळीच्या मते, “भरत शहा यांचे मोठे युवा शक्ती प्रदर्शन आहे, तर राजकीय विश्लेषकांच्या मते ही उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विजयाची नांदी होय.कारण शहा हे धुरंधर राजकारणी आहेत.
त्यांचे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त आहे.त्यांची माणुसकीची नाळ ही जन सामन्यांच्या जिव्हाळ्याशी आणि आपलेपणाची भावनांशी जोडली गेली आहे.
म्हणून त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे.याचीच प्रचिती म्हणून इंदापूर तालुक्यातील आणि शहरातील असलेला त्यांच्या पाठीशी असलेला युवा वर्ग!ही फळी इंदापूर शहरात मोठी क्रांती घडवू शकते.
शिवशंभो प्रतिष्ठान ,प्रशांत(मामा ) उंबरे युवा मंच, शहीद भगतसिंग प्रतिष्ठान, शकीलभाई मित्र परिवार, उमेश ढावरे – रोहित ढावरे – बापू आडसुळ आणि गोरख ढावरे मित्र परिवार, योगेश भैय्या मित्र परिवार, ए.पी. कंपनी , मा.श्री. भरतभाऊ शहा मित्र परिवार, ओंकार शिंदे मित्र परिवार,समस्त गार्डे आणि घोगरे मित्र परिवार माळवाडी नं १,लोकसेवा युवा फाऊंडेशनचे संस्थापक /अध्यक्ष गौरव प्रकाश राऊत मित्र परिवार, अलीबाबा मित्र परिवार, नवयुवक मित्र मंडळ , पोरा पोरांची चावडी, फिरोजखान पठाण मित्र परिवार,टिपू सुलतान यंग सर्कल,अजय जाधव मित्र परिवार, धर्मवीर संभाजी मित्र मंडळ संभाजी चौक, तिरंगा प्रतिष्ठान व्यंकटेश नगर, अमोल माने मित्र परिवार, भरत शहा मित्र परिवार,व्यंकटेश नगर, युवराज पवार मित्र परिवार,श्री बालाजी गणेशोस्तव मित्र मंडळ, व्यंकटेश नगर,क्रांतिसिंह मित्र मंडळ बाबा चौक , मा.श्री प्रवीण हरणावळ मित्र परिवार,शुभम भैय्या मित्र परिवार,गणेश पवार मित्र परिवार व्यंकटेश नगर,अभिजीत(भैय्या) अवघडे मित्र परिवार,सोनुभाऊ सय्यद अध्यक्ष तिरंगा प्रतिष्ठान,समस्त लोहार समाज इंदापूर,हर्षल गवळी मित्र परिवार, संकल्प शेठ मित्र परिवार गजानन गवळी मित्र परिवार अशा अनेक शहरातील मित्र मंडळ शहा यांच्या सोबत आहे.येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत शहा यांच्याकडून संपूर्ण पॅनल होण्याची प्रचंड शक्यता बळावली आहे.त्यामुळे भरत शहा यांची धास्ती भल्या-भल्यांनी घेतलेली दिसून येते.
परंतु याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी कुठलाच दुजोरा दिला नाही.केवळ हा वाढदिवस स्नेह आणि आपलेपणाचा आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही.