भरत शहा यांचा जन्मदिन इंदापूर शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात साजरा
इंदापूर(प्रतिनिधी): कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सहकारी कारखान्याचे विद्यमान व्हा. चेअरमन भरत शहा यांचा वाढदिवस इंदापूर शहरातून ठीक ठिकाणी साजरा करण्यात आला.इंदापूर शहरासह तालुक्यातील ठीक=ठिकाणांहून वाढदिवस साजरा करण्यात आला.
तसेच इंदापूर शहर व परिसरात त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर मोठ्या प्रमाणात झळकल्याने तालुक्यात फक्त त्याच्या वाढदिवसाची चर्चा चालू होती.
विशेष करून इंदापूर शहरातील मोठी युवा फळी त्यांच्या पाठीशी उभी आहे.येणारी आगामी इंदापूर नगर पालिकेची निवडणूक मान आणि प्रतिष्ठेची आहे.कारण इंदापूर शहराचा कायापालट शहा यांच्याकडून झाल्याचे मानले जाते.त्यामुळे केवळ युवा वर्गच नव्हे तर बाल अबाल वृद्ध माता भगिनी सर्वच स्तरातील सामान्य जनता त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे दिसून येते.
शहा परिवाराकडून अनेक सामाजिक उपक्रम या ना त्या निमित्ताने शहरात राबिवले जातात.त्यामुळे शहा परिवार हे नेहमीच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. उलट त्यात आणखीनच वाढ झालेली दिसून येते.
भरत शहा यांना दानशूर व्यक्तिमत्त्व मानले जाते.याची प्रचिती त्यांच्या विरोधकांना देखील आहे.म्हणूनच सर्वच तळागाळातील जनता त्यांना आपला नेता मानतात.शहा परिवाराने सर्व धर्म समभाव जपल्याने सगळ्याच धार्मिक सोहळ्यामध्ये ते आवर्जून उपस्थित असतात.तसेच राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंतीला अभिवादन करण्यासाठी न चुकता उपस्थित असतात. त्यामुळे सर्वच जाती धर्माच्या लोकांना ते आपलेसे वाटतात.म्हणूनच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने त्यांची भूमिका अतिशय महत्वाची मानली जाते.
सौ.अंकिता शहा या इंदापूर नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा असून त्या जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षा आहेत.त्यांनी त्यांच्या ५ वर्षाच्या कार्यकाळात इंदापूर शहरात अमुलाग्र बदल घडवून इंदापूर शहराचा कायापालट केला.त्यांनी त्यांच्या ५ वर्षाच्या कार्यकाळात इंदापूर शहरात अमुलाग्र बदल घडवून इंदापूर शहराचा कायापालट केला.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत देश पातळीवर इंदापूर शहराचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले. त्यामुळे इंदापूरकरांना स्वच्छते बद्दलचे महत्त्व पटले आणि ते आणि लोकांनी ते अंगीकारले देखील.याचे उत्तम उदाहरण शहरातील सुरू असलेली कचरा घंटा गाडी होय म्हणूनच जनतेला आरोग्याचे महत्व पटले.
त्यांच्याच काळात इंदापूर नगरपरिषदेची नवीन इमारत उभी राहिली. शहरातील अंतर्गत रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतील त्यांना प्रमुख समस्येत प्राधान्य देवून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला.
बऱ्याच वर्षांपासून नगरपालिकेचे वीज बिल भरले नव्हते. त्यामुळे सारे गाव अंधारात होते.कोट्यवधी रुपयांची रक्कम त्वरित भरून गावाला पुन्हा प्रकाशमय केले. जुने विद्युत संच उतरून नवीन विद्युत संच बसविण्यात आले. शहरातील प्रमुख ठिकाणी हाईमस्ट दिवे बसवण्यात आले.
पाणी पुरवठ्याच्या संदर्भात त्यांनी प्रत्येक भागात उच्च दाबाने पाणी सुरू करण्यासाठी नवीन पाईप लाईन सुरू केल्या . त्यामुळे पूर्वी सारखे माता भगिनींना हांडे मोर्चा काढण्याची वेळ येऊ दिली नाही.
भरत शहा यांचे व्यापारी धोरण अतिशय दूरदृष्टीचे असल्याकारणाने त्यांनी विद्यमान महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून इंदापूर शहराच्या विकासासाठी आणि इंदापूर शहर हे मोठी बाजार पेठ व्हावी म्हणून त्यांनी कुगाव शिरसोडी असा उजनी धरणातील भव्य ब्रीज ३९४ कोटीचा मंजूर करून घेतला.
मागासवर्गीय नागरिकांचा विकास करून त्यांचे राहणीमान आणि जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले. रमाई आवास योजनेअंतर्गत शेकडो लाभार्थींना हक्काची घरे मिळवून दिली.तेथील पाणी पुरवठा असो, लाईट व्यवस्था असो अश्या सर्व समस्या मार्गी लावण्याचे प्रयत्न केले.मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा यासाठी त्यांनी डॉ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभ्यासिकेची निर्मिती करून दिली. आज अभ्यासिकेतून बरेच तरुण अधिकारी झालेले दिसून येतात. इंदापूर शहरातील एकमेव सर्व सोईंनी अशी अभ्यासिका निर्माण करण्याचे श्रेय खऱ्या अर्थाने त्यांनाच द्यावे लागेल.
अशी बरीच समाज उपयोगी कामे त्यांनी इंदापूर शहरासाठी केली आहेत.शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाचा ऑक्सीजन मिळावा यासाठी शहा नर्सरीच्या माध्यमातून हजारो झाडे लावून त्यांना जतन करण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे शहरातील हजारो वृक्षांना जीवनदान देण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते आहे.
महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत त्यांनी अनेक महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना स्वयं रोजगार देण्याचे काम केले.म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून इंदापूर नागरिकांच्या मनात विकासाचा ठसा उमटविला आहे.
उद्याच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्यांच्याकडे पुन्हा शहराचे नेतृत्व यावे यासाठी इंदापुरातील जनता आग्रही आहे.