भरत शेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त अभिवादन!
इंदापूर – रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, जनतेच्या शिक्षणाचे जनक आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर शहरात आज भरत शेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व महाविद्यालयाच्या वतीने ही मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत झांज पथक, लेझीम पथक तसेच विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांचे मन मोहित केले. मिरवणुकीदरम्यान रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य देत सद्भावना रॅली काढण्यात आली. यावेळी इंदापूर शहरातील प्रमुख ठिकाणी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
भरत शेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने कर्मवीर अण्णांना पुष्पहार अर्पण करून त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी गणेश महाजन, शकील सय्यद, प्रमोद राऊत, सुनील तळेकर, बंडू चव्हाण, अर्शद सय्यद, अभिजित अवघडे, अक्षय सूर्यवंशी यांच्यासह इतर मान्यवर व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
या भव्य मिरवणुकीमुळे इंदापूर शहरात उत्साह, ऐक्य आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कर्मवीर अण्णांच्या कार्याला व विचारांना अभिवादन केले.