भरत शेठ शहा यांची निर्णायक भूमिका ठरवेल उद्याचा भावी आमदार!१० ते १५ हजार मतदार त्यांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत!
इंदापूर(प्रतिनिधी): इंदापूर तालुक्यातील राजकारण आता शिगेला पोहचले असून प्रचाराचा धुराळा सगळीकडे उडाला आहे. त्यातच तिसऱ्या आघाडीचे नेते भरतशेठ शहा व अप्पासाहेब जगदाळे काय भूमिका घेणार याच्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. कारण मा. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना दिलेल्या उमेदवारीने त्यांच्यात नाराजीचा गट निर्माण झाला आहे. कारण लोकसभेच्या काळात खासदार सुप्रिया सुळे यांना या नेत्यांनी अधिकचे मताधिक्य देवून सिंहाच्या वाट्याची भूमिका घेतली. आणि इंदापूर तालुक्यातून त्यांना २६ हजाराचे मताधिक्य देखील दिले. महायुतीचा भाग म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे काम केले आणि ते उघडपणे घड्याळाचे काम केले. तरीसुद्धा शरदचंद्र पवार गटाने त्यांना पक्षप्रवेश घेऊन उमेदवारी दिली. शरदचंद्र पवार गटातून त्यांना फार मोठा विरोध झाला. आणि त्याचा वाद मोटिबागेत गेला . परंतु इंदापूर विधानसभेसाठी पाटील यांचीच निवड झाल्याने पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा उगारला. त्याची प्रणती म्हणून अपक्ष म्हणून लढण्याचे ठरले आणि प्रवीण माने किंवा अप्पासाहेब जगदाळे हे तिसऱ्या आघाडीचे उमेदवार असतील असे चित्र निर्माण झाले. जाहीर सभेत आप्पासाहेब जगदाळे यांनी आपल्या सोबत झालेल्या अन्यायाची आपबिती सांगितली. तर भरत शेठ शहा यांनीदेखील आपल्या मनातील सल व्यक्त केली.
यानंतर प्रवीण माने यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला.आणि आपल्या प्रचाराला सुरुवात केली.परंतु भरत शेठ शहा आणि अप्पासाहेब जगदाळे हे स्थिर असून अद्याप त्यांच्याकडून कोणताच निर्णय नसल्याने संपूर्ण इंदापूर तालुक्याचे त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे.तर अप्पासाहेब जगदाळेंचा निर्णय आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे.भरत शेठ शहा हे देखील लवकरच आपली भूमिका स्पष्ट करतील असे चित्र निर्माण झाले आहे.
भरत शेठ शहा यांना मानणारा वर्ग इंदापूर तालुक्यात असून ते काय निर्णय काय घेतील याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
कारण भरत शहा यांच्यामागे जवळ जवळ१० ते १५ हजार मताचा गठ्ठा असून ते एकगठ्ठा मत कोणाच्या पारड्यात पडणार ? आणि कोण विजयाचा शिलेदार होणार? आणि होणारा भावी आमदार भरत शेठ यांच्या निर्णयानेच होणार हे मात्र नक्की!
भरत शेठ शहा यांच्या पाठीमागे इंदापूर शहर आणि तालुक्यातील तरुणांची खूप मोठी फळी उभा असल्याचे चित्र जाणवते. तर त्यांनी तालुक्यातील गोर गरिबांना त्यांच्या सुख दुःखात खूप मदत देखील केली आहे. म्हणून त्यांच्याकडे दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते.इंदापूर तालुक्यातील शैक्षणिक , सामाजिक आर्थिक आणि धार्मिक कार्यात शहा परिवाराचा वाटा आहे. इंदापूर शहर आणि तालुक्यातील काही परिसर सुजलाम् सुफलाम् करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून शहा परिवाराचे इंदापूर तालुका जडण घडणीमध्ये मोलाचे योगदान आहे.आणि तीच परंपरा भरत शेठ आणि मोठे बंधू मुकुंद शेठ शहा यांनी जपली आहे. म्हणूनच त्यांच्या पाठीमागे मोठा जनाधार आहे.
मात्र त्यांच्याकडून जो काही निर्णय होईल तो मात्र नक्की गेम चेंजर असेल.कारण त्यांचा एक निर्णय कोणाला विजयी करायचे आणि कोणाला पराजित करायचे हे ठरवू शकतो.
भरत शेठ शहा कोणता निर्णय घेतील याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. आणि त्यांच्या पाठीमागे उभ्या असणाऱ्या तमाम मतदार राजाचे!