भीमाई आश्रमशाळेची प्रिती निघाली इस्रो भेटीला!
भीमाई आश्रमशाळेची प्रिती निघाली इस्रो भेटीला!
इंदापूर :(प्रतिनिधी):इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या खाजगी विजाभज प्रवर्गाच्या उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना इस्रो ( भारतीय अंतराळ संशोधन (संस्था)या संस्थेस भेट देण्यासाठी पुणे विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी एका ठिकाणी चाचणी परीक्षा (दि.२७) घेण्यात आल्या.
पुणे जिल्ह्यात मुखई ता.शिरुर येथे घेण्यात आलेल्या चाचणी परीक्षेत मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अंकित असणाऱ्या राजमाता अहिल्याबाई होळकर निवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळेची कु. प्रीती सुरेश विटकर (अकरावी विज्ञान) ही उत्तीर्ण झाली.पुणे विभागाच्या गुणवत्ता यादीत निवड झाल्याने तिची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे.
शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला (काकी) मखरे, सचिव ॲड. समीर मखरे व प्राचार्या अनिता साळवे यांनी कु. प्रिती विटकरचे अभिनंदन करुन इस्रो या संस्थेस भेटीसाठी शुभेच्छा दिल्या.
कु.प्रिती विटकरचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.