कै.मारुती सोनवणे (पाटील ) मित्र परिवाराच्या वतीने शेकडो विठ्ठल भक्तांसाठी अन्नदान उपक्रम!
( इंदापूर) :शहरात संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा एक दिवस मुक्काम होता. त्यानिमित्ताने इंदापूर नगरी दुमदमून निघाली. संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूरात दाखल होताच कै.मारूती सोनवणे (पाटिल ) मित्र परिवार आणि इंदापुर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष व इंदापूर नगरपरिषदेचे मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे परिवाराच्या वतीने शेकडो वारकरी व विठ्ठल भक्तांसाठी भोजन व्यवस्था उत्तम सोय केली होती. वारकरी भक्तानीं भोजनाचा आस्वाद घेतला.
यावेळी सोमनाथ सोनवणे, सतिश सोनवणे, सौ. विजया खंडाळे,उज्वला आरडे यांनी विषेश सहकार्य केले.तसेच विलास सोनवणे,ज्ञानेश्वर सोनवणे, विकास सोनवणे, सागर सोनवणे,समिर सोनवणे, दिग्विजय सोनवणे, सनी सोनवणे,मिलन सोनवणे,अजय सोनवणे, रवी सोनवणे, सुमित आरडे, दिपक सोनवणे,सोमनाथ खंडांळे, सुरज खंडाळे, किरण खंडाळे,अक्षय कुचेकर,चाँद खंडाळे,अभिषेक कुचेकर,उत्तम कुचेकर, किशोर ढावरे, यांनी परिश्रम घेतले.बाळासाहेब आडसुळ, राजु शिंदे, मुकिंद शिंदे,बंडू साठे,सोहम सोनवणे,आप्पा किशोर ढावरे,सोमनाथ ढावरे,यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सहकार्य केले.