छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक – गटनेते तथा नगरसेवक कैलास कदम फुले शाहू आंबेडकर यांचे विचारच देशाला तारतील – मा. नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे
छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक – नगरसेवक कैलास कदम
- फुले शाहू आंबेडकर यांचे विचारच देशाला तारतील – मा. नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे
साठेनगर येथे राजर्षी शाहू महाराज यांचा १०३ वा स्मृतीदिन संपन्न
इंदापूर (प्रतिनिधी): लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची १०३ वी पुण्यतिथी युगप्रवर्तक श्री शाहू बहूउद्देशीय सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साठेनागर इंदापूर येथे आयोजित करण्यात आली होती.
मा. नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे म्हणाले की,फुले शाहू आंबेडकर हा विचार समाजात खोलवर रुजला पाहिजे तरच या देशाचे भवितव्य उज्वल असेल असा विचार त्यांनी व्यक्त केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे शाहू महाराजांच्या सानिध्यात राहिले. महाराजांनी आंबेडकरांना अस्पृश्यांचे देशाचे पहिले पुढारी घोषित केले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. शिवाजी शिंदे आणि त्यांचे सहकारी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करत असतात. त्यामुळे शहरातील नागरिकांनी या कार्यास मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असेही ते म्हणाले.
महाराजांनी जातीवाद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बहुजन समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून दिला. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.
यानंतर मा. नगरसेवक तथा गटनेते कैलास कदम यांनी युगप्रवर्तक श्री शाहू बहू उद्देशीय सेवा प्रतिष्ठान यांचे कौतुक केले.
यावेळी नगरसेविका राजश्री मखरे, मा. नगरसेवक दादासाहेब सोनवणे, प्रा. अशोक मखरे,शिवाजी मखरे,सुहास मोरे गुरुजी,वंचित युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष किर्तिकुमार वाघमारे, साजन ढावरे, बी.एस.ग्रूप अध्यक्ष बंटीभाऊ सोनवणे, पोपट खिलारे, युवानेते अभिजित अवघडे, रीपाई इंदापूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे, सामाजिक कार्यकर्ते सतीश सागर,मातंग एकता आंदोलन पुणे जिल्हाध्यक्ष ललेंद्र शिंदे,लहुजी भक्त सोमनाथ शिंदे, बहुजन मुक्ती पार्टी इंदापूर तालुकाध्यक्ष सुभाष खरे,अशोक पोळ,अमोल खराडे, ॲड. मयूर शिंदे,अजय पारसे,गोरख तिकोटे, विद्रोही कवी माऊली नाचण, पोपट उंबरे, अतुल लोखंडे, पत्रकार अशोक घोडके, दत्ता मिसाळ,पोलिस हवालदार तुषार ढावरे, गोरख ढावरे,अरविंद मखरे, नवनाथ मखरे, अभजीत मखरे गुरुजी, सिद्धार्थ चीतारे,विकास शिंदे, महादेव उकिरडे, नाना भोंग, बाळासाहेब मखरे, भीमराव झेंडे, तेजस अवघडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्वर मणियार यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण राऊत यांनी केलं आणि आभार प्रदर्शन शिवाजी शिंदे यांनी केले.
उत्तम गायकवाड आणि सुहास शेवाळे आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.