अविरत संघार्षशील नेता माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटील यांनी राज्याच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, आधुनिक काळाची जाणीव, शेती प्रश्नांसह इतर सामाजिक प्रश्नांचा अभ्यास, सजग लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा लौकीक आहे.
वयाच्या २२ व्या वर्षी हर्षवर्धन पाटील यांनी दूध संघाच्या माध्यमातून संचालकपदावर काम करण्यास सुरवात केली. १९९५ साली अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवून ते भरघोस मतांनी विजयी झाले. समाजामध्ये राजबिंडे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची नवीन ओळख सुरू झाली.(स्वर्गीय) शंकरराव पाटील भाऊंच्या कार्याचा वारसा व इंदापूर येथील जनतेच्या आशीर्वादामुळे राज्यातील अपक्ष आमदारांचे गटनेते झाले. व युतीच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. १९९९ ते २००९ पर्यंतच्या निवडणुकीमध्ये सहज विजय मिळवला. राज्यातील सहा मुख्यमंत्र्यांच्या समवेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांची खास मैत्री होती.
इंदापूर तालुक्यातील अनेक प्रश्न त्यांनी सोडविले. राजकीयदृष्ट्या घराण्याची परंपरा होती तरी संघर्षही तितकाच त्यांना करावा लागला. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीत किंवा भांडणात अनेकदा इंदापूर हा मतदारसंघ केंद्रस्थानी असल्याचे या पूर्वी घडले आहे. त्यामुळे आगामी २०२४ ची विधानसभा निवडणूक पाटलांसाठी मह्त्त्वाची आहे.
सामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे असामान्य नेतृत्व ही हर्षवर्धनजी पाटील यांची सर्वत्र खरी ओळख ! राज्यातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक असणारे आमचे साहेब म्हणजे कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व यांचा अफलातून त्रिवेणी संगम आहे. संयम आणि शालीनता असणारे साहेब राज्याच्या राजकारणात एकमेव वेगळे व्यक्तिमत्व गणले जाते. खरं तर राजकारणात आक्रमकता आवश्यक असते. तथापि, संयमीपणा दाखवूनही जनसेवेचे अविरत व्रत कसे सहज साध्य होऊ शकते ? याचे सर्वात मोठे उदाहरण अर्थातच हर्षभाऊ हे होय.. त्यांच्या सर्वसमावेशक आणि संयमी नेतृत्व कौशल्यामुळे भाजप पक्षातील ते महत्त्वाचे नेते आहेत. ही बाब कोणी कदापि नाकारू शकणार नाही.
मा. हर्षवर्धनजी पाटील साहेब हे तत्कालीन मंत्रीमंडळात मंत्री असताना, सत्ता स्थापनेच्या स्फोटक कालखंडात पक्षाची बाजू विलक्षण पद्धतीने मांडण्याचे शिवधनुष्य त्यांनी अगदी सहजपणे पेलून धरल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. संसदीय कामकाज, कृषी, सहकार, पणन यासह इतर महत्वाच्या खात्याची धुरा सांभाळताना त्यांच्यातील हुशार व कुशल नेतृत्वाची चुणूक महाराष्ट्रातील जनतेने अनुभवली आहे..
मा. हर्षवर्धनजी पाटील साहेबांनी राज्याच्या राजकारणात आपल्या कार्यकौशल्याची अमीट छाप उमटविली आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांमध्ये एक विश्वासार्ह नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. अजातशत्रू व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे ना. हर्षवर्धनजी पाटील साहेब होय ! असंख्य इंदापूरकरांचे आधारस्तंभ असणारे मा. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून जनतेची सेवा घडो ! अर्थातच भाजपच्या प्रगतीरथाचे सारथी बनावे, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना…महासागराप्रमाणे नितळ आणि हिमालयाप्रमाणे अखंड असलेला आमचा आधारवड ! आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आपण शतायुषी व्हा, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!!
शब्दांकन – प्रा.रवींद्र साबळे सर
आय कॉलेज इंदापूर