डाळजकरांनी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांचे घोड्यावरून केले जंगी स्वागत आणि जेसीबीतून केली पुष्पवृष्टी !
इंदापूर( प्रतिनिधी): अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांचा इंदापूर तालुका जन संपर्क दौरा चालू आहे. तालुक्यातील ठीक ठिकाणांहून त्यांचे जोरदार स्वागत केले जात आहे.
त्यांच्या या जन संपर्क दौऱ्याला गावा गावातील जनता भर भरून प्रतिसाद देत आहेत.
याचीच प्रचिती म्हणून प्रवीण माने आपल्या डाळज नं २ या गावी गेले असता त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यांची घोड्यावरून जंगी मिरवणूक काढण्यात आली. तर पुढे जात असताना जेसीबीतून पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.गावातील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन महाराजांना वंदन करण्यात आले.
यांनतर त्यांनी जनतेने केलेल्या स्वागताचे आभार मानले. आणि आपल्यावर असेच प्रेम राहावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यानंतर मी या आमदार पदाचा उमेदवार नसून आपण सर्व उमेदवार आहोत या भावनेने मतदान करा.
कोणाच्या दबावाला बळी पडू नका तसेच अमिषाला देखील बळी पडू नका . तालुक्यातील युवकांच्या हाताला काम प्रथम द्यावे लागेल. तरच तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास होईल. तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या पाण्याच्या संदर्भातील समस्या दिवसं-दिवस बिकट होत चालली आहे.त्यामुळे आजही २२ गावाचा प्रश्न तसाच आहे. याच्यावर केवळ आणाभाका व वल्गना केल्या जातात. आपण आरोग्य सभापती असताना आपल्या प्रयत्नातून जेवढी आरोग्य संदर्भातील असलेली मदत देण्याचे काम केले. काही ठिकाणी थोडा विलंब झालेला देखील असेल पण प्रयत्न मात्र नक्की केले.
तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न हेच आपले पहिले प्राधान्य असेल कारण तालुक्यातील पाण्याची समस्या सुटली तरच शेतकरी आणि सामान्य नागरिक यांच्या समस्या सुटतील आणि तालुका सुजलाम् सुफलाम् होईल.
त्यामुळे भविष्यात कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार आणि शेतकरी आणि कष्टकरी स्वयंभू होईल.
यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.