दत्तात्रय जगताप यांची लहुजी शक्ती सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड
इंदापूर(प्रतिनिधी): लहुजी शक्ती सेनेच्या महाराष्ट्र सचिव पदी निवड करण्यात आली असून पुणे जिल्हा अध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली आहे.
यावेळी जगताप यांच्याशी बोलताना ते म्हणाले की, संघटनेने आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो खऱ्या अर्थाने आपल्या कामाचे सार्थक झाल्याचे समाधान आहे .
आपण पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात करणार आहोत. मातंग समाज हा अजून प्रगती पथावर नाही. इतर समाज या बाबतीत पुढे गलेला आहे. म्हणून समाजाने मुख्य प्रवाहात येण्यासाठी साथ सहयोग करावा जेणेकरून समाजाच्या समस्या चांगल्या पद्धतीने सोडवता येतील.
पुढे ते म्हणाले की, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांनी समाजाच्या अनेक समस्या शासनासमोर मांडल्या आहेत. तसेच आरक्षण हा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे. येत्या काळात आपण हाच प्रश्न तीव्र स्वरूपात शासनापुढे मांडणार आहोत
यावेळी त्यांनी समाजातील अनेक समस्या मांडून त्यावर आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास दादा खंदारे यांच्यासह राज्य कमिटी वरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते