इंदापूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे धम्मचक्र परिवर्तन दिन आनंदात साजरा
इंदापूर (प्रतिनिधी):इंदापूर येथील डॉ .बाबासाहेब आंबेडकर नगर येथे ६८ व्या धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्त परिवर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी समाजातील मान्यवर व बुद्धिजीवी वर्ग उपस्थित होता.यावेळी विविध बौद्ध उपासकांनी आपल्या बौद्ध बांधवांना धम्माचे महत्व पटवून दिले.आपला धम्म कसा वाढवता येईल याबाबत धम्मशिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी त्रिशरण,पंचशील , भीम वंदना व धम्मवंदना घेण्यात आली.जेतवन बुद्धविहार परिसर हार फुलांनी सजवण्यात आला होता. यावेळी भीमगीतांनी नगरी दुमदुमून गेली होती.
विविध मान्यवरांनी आपल्या बौद्ध बांधवांना धम्माचे महत्व पटवून दिले.आपला धम्म कसा वाढवता येईल याबाबत धम्मशिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रा.बाळासाहेब मखरे, प्रा.अशोक मखरे, आर. पी. आय. पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी मखरे, आर.पी.आय जिल्हा सर चिटणीस संदीपान कडवळे, आंबेडकरी चळवळीतील नेते बाळासाहेब (मामा) मखरे, हनुमंत कांबळे, सुहास मोरे गुरुजी, वंचित आघाडीचे शहराध्यक्ष सुभाष खरे ॲड. सूरज मखरे, युवा कार्यकर्ते आशिष गायकवाड, दर्याराज मखरे, पप्पू मखरे, उमेश मखरे ,साबळे, दीपक चव्हाण आणि अप्पा मखरे आदी उपस्थित होते.