मराठवाड्याचे प्रवेशद्वार असेल शिरसोडी – कुगावचा होणारा पुल!शिरसोडी – कुगाव पुलाद्वारे मराठवाडा -पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणार!आमदार दत्तात्रेय भरणे यांनी इतिहास निर्माण केला.
मराठवाड्याचे प्रवेशद्वार असेल शिरसोडी – कुगावचा होणारा पुल!
•शिरसोडी – कुगाव पुलाद्वारे मराठवाडा -पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणार!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विषयाला मान्यता दिली.
•आमदार दत्तात्रेय भरणे यांनी इतिहास निर्माण केला!विधानभवनात विषय सादर करताना…
•कुगाव सरपंच सौ.तेजस्विनी कोकरे यांच्या प्रयत्नाला अखेर यश
•शिरसोडी – कुगाव पुलाद्वारे पुणे सोलापूर जोडून दळणवळण होणार गतिमान!
•इंदापूर – करमाळा दोन तालुके एकमेकांना जोडले जाणार.
इंदापूर( प्रतिनिधी):बऱ्याच दिवसांच्या चर्चेनंतर भरणे यांच्याकडून विधानसभेत विषय मांडून चर्चा सत्र घडले.आमदार भरणे यांनी केवळ दोन जिल्हे किंवा तालुके यांना जोडले नाही तर चक्क पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा जोडण्याचे काम केले आहे. कारण राष्ट्रीय महामार्ग ६५वरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालते. अहमदनगर जिल्ह्यातील वाहतूक टेंभुर्णीमार्गे केली जाते परंतु हा जर पुल झाला तर बरीचशी वाहतूक याच पुलावरून होण्याची शक्यता असेल.परंतु हा पूल एका राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर उभारणे आवश्यक आहे. कारण येथून खूप मोठे दळणवळण होणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार भरणे यांनी मांडलेल्या विषयाला अनुमती देऊन चालू वर्षात हा पूल बांधण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
हनुमान जन्मभूमी कुगाव ता.करमाळा ते शिरसोडी ता. इंदापूर पुलाचा विषय मार्गी लागला असून तत्कालीन सरपंच ग्रामपंचायत कुगाव तेजस्विनी दयानंद कोकरे यांनी पाठपुरावा केलेला होता.मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा हा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग असेल.
मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र यातील तब्बल १०० कि.मी.कमी होईल.यामुळे इंदापूर शहराची उलाढाल पाचपट वाढणार आहे.
रुई येथील बाबीर देवस्थानाला भेट देणाऱ्या बाबीर भक्तांची गैरसोय दूर होऊन भक्तगण मोठ्या संख्येने येतील.पुणे मार्केट येथे तरकारी मालाला योग्य बाजारपेठ याच मार्गातून उपलब्ध होईल.
करमाळा व इतर भागातील उसाला पश्चिम भागात मोठी बाजारपेठ निर्माण होईल. त्यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक विकास होईल.
उजनी बॅकवॉटर टुरिझम ट्रँगल परिसर(इंदापूर – भिगवण – करमाळा) विकसित होईल. या पुलामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटा सुकर होऊन जातील , आरोग्याच्या सोयी ग्रामीण भागातील लोकांना सहजतेने उपलब्ध होतील.मासेमारी करणाऱ्या बांधवांना इंदापूर व भिगवण मस्त्य बाजारपेठ काबीज करता येईल.करमाळा तालुक्यातील तरुणांना रोजगार संधी उपलब्ध होणार.
कुगाव नदिपात्रासमोरील सात गावांचे क्षेत्र असून यात सुगाव, वाशिंबे , गंगावळण, कळाशी, कालठण व पडस्थळ या गावांचा समावेश आहे.
कुगाव ही हनुमानाची जन्मभूमी मानली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात भक्तांची रीघ असते. त्यामुळे भक्तांना व स्थानिक लोकांना खाजगी नौकांची मदत घ्यावी लागते. त्यापैकी शिरसोडी ते कुगाव अत्यंत जवळचे अंतर मानले जाते.सदरच्या पुलाची लांबी १.५कि.मी.असेल त्यामुळे जवळ जवळ ७०ते ८०कि.मी कमी होईल. मराठवाड्याचे प्रवेशद्वार असेल शिरसोडी – कुगाव पुल!दिल्लीचा महामार्ग इंदापूर ला जोडला जाईल.आवाटी परिसरात येणाऱ्या भक्तांची व मुस्लिम बांधवांची गैरसोय दूर होईल.दळणवळण अंतर कमी होऊन पेट्रोल-डिझेल ची मोठी बचत होईल.तसेच ३०लाख मेट्रिक टन ऊसासाठी पर्यायी कारखाने उपलब्ध होतील.सौ. तेजस्विनी दयानंद कोकरे सरपंच कुगाव यांनी अनेक वर्ष या संदर्भात आवाज उठवला. संघर्ष देखील केला. कुगाव पर्यटन विकास केंद्र होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला.साधारण या पुलासाठी १२५ कोटी रुपये इतका खर्च होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.गाळ मिश्रित वाळू निघाल्यास धरणातील पाणीसाठा १५ टीएमसीने वाढेल. व सरकारकडे करोडो रुपयांची रॉयल्टी जमा होईल.