इंदापूरच्या विधानसभेच्या इतिहासात प्रथमच तीन हर्षवर्धन पाटील आणि दोन दत्तात्रय भरणे असे पाच उमेदवार एकत्र लढणार!
इंदापूर ( प्रतिनिधी) : इंदापूर विधानसभेच्या इतिहासात प्रथमच तीन हर्षवर्धन पाटील नावाने तर दोन दत्तात्रेय भरणे नावाने उमेदवार लढणार असून ही सेम आडनावाची पंचरंगी लढत अतिशय मनोरंजक ठरेल पण मात्र मतदार राजासाठी डोकेदुखी नक्की ठरेल.
कारण बऱ्याच उमेदवारांना आपला उमदेवार कोणता हे समजण्यास कठीण होऊन जाईल आणि वड्याचं तेल वांग्यावर अशी परिस्थिती होईल. बऱ्याचदा सामान्य नागरिकांना मतदान करताना जर सारख्या नावाची व आडनावाची दोन किंवा व्यक्ती लढत असेल त्यांच्यासाठी ते एक प्रकारचे कोडे होऊन बसते.
वरील पाच उमेदवारांची ओळख पुढील प्रमाणे
१) हर्षवर्धन शहाजीराव पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरदचंद्र पवार) ( वय – ६१)
रा. बावडा ता. इंदापूर जि. पुणे.
मा. संसदीय कामकाज मंत्री म.राज्य
२) हर्षवर्धन गोपाळराव पाटील – अपक्ष( वय २९)
राहणार – एकशिव ता. माळशिरस जि.सोलापूर
३) हर्षवर्धन श्रीपती पाटील – अपक्ष ( वय ४२)
रा. निमगाव केतकी ता. इंदापूर जि. पुणे
आता आपण भरणे आड नावाचे दोन उमेदवारांची ओळख पाहू
१) दत्तात्रेय विठोबा भरणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष( शरदचंद्र पवार ) वय- ५६
मु. भरणेवाडी पो. अंथूर्णे ता. इंदापूर जि.पुणे
मा.राज्यमंत्री म राज्य
२) दत्तात्रेय सोनबा भरणे – अपक्ष
मु.पो. विठ्ठलवाडी ता. शिरूर जि.पुणे वय( ५१)