ग्रामदैवत इंद्रेश्वराची महाशिवरात्रीदिनी आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते दीपपूजन व महाआरती संपन्न!
ग्रामदैवत इंद्रेश्वराची महाशिवरात्रीदिनी आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते दीपपूजन व महाआरती संपन्न
इंदापूर: (प्रतिनिधी ): आज पहाटे महाशिवरात्री निमित्त इंदापूर शहराचे ग्रामदैवत इंद्रेश्वराची महाआरती व दीपपूजन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या झाला.यावेळी ते म्हणाले की, आपणाला दरवर्षी सालाबादप्रमाणे यंदाही पूजेचा मान दिला त्याबद्दल त्यांनी ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर ट्रस्ट इंदापूरचे आभार मानले. व पुढे ते म्हणाले की, येत्या काही दिवसांत छत्रपती मालोजीराजे भोसले यांची गढी दुरुस्ती कामकाज सुरू होईल, त्यामुळे इंदापूर शहर व तालुक्याची उत्कृष्ट पर्यटन केंद्र म्हणून ओळख महाराष्ट्र राज्यात होईल.तसेच इंदापूर शहरासाठी १५० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याची कामे लवकर सुरू होईल असे आश्वासन त्यांनी दिले.
काल ग्रामदैवताची गाव प्रदक्षिणा फेरी असताना आमदार भरणे हे यात सहभागी झाले. पारंपरिक वाद्य वाजवत भक्तांची मने जिंकली. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी देखील यामध्ये सहभागी होऊन इंदापूर करांची मने जिंकली.
यानंतर अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.कालच्या ग्राम प्रदक्षणेमध्ये “महाकाल” देखावा केंद्रबिंदू बनला.यावेळी ट्रस्टी संदीप वाशिंबेकर, धीरज शहा, बानकर , शेटे पाटील , व अनेक यावेळी उपस्थित होते.