गुरुपौर्णिमेनिमित्त इंदापूर शहरातील युवकांचा स्तुत्य उपक्रम : शहा परिवारासमवेत साजरी केली गुरुपौर्णिमा
इंदापूर (प्रतिनिधी) :गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण असून ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शनाचे प्रतिक असलेल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरातील युवा उद्योजकांनी शाहा परिवारासमवेत उत्साहात व भक्तिभावाने गुरुपौर्णिमा साजरी केली.
कार्यक्रमात उपस्थित युवकांनी भरत शहा आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू मुकुंद शहा यांच्याविषयी विशेष गुरुभाव व्यक्त केला. शहा बंधूंनी इंदापूर परिसरात सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या मार्गदर्शनाचा व योगदानाचा विशेष उल्लेख करून त्यांचे आभार मानले. त्यांच्या नेतृत्वाखाली युवक घडत असून ते आजच्या पिढीसाठी प्रेरणास्थान असल्याचे वक्तव्य उपस्थितांनी केले.
या प्रसंगी युवा उद्योजक अंगद शहा, शकील सय्यद, अर्शद सय्यद, सुनील तळेकर, अभिजीत अवघडे, अक्षय सूर्यवंशी, गौरव राऊत, दादा बोराटे, मनोज राजगुरू, ओमकार शिंदे, अमोल माने, महेश पाटील, चैतन्य वाघमोडे यांची उपस्थिती होती.
भरत शहा मित्र परिवार, इंदापूर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात गुरुंच्या प्रतिमेचे पूजन, पुष्प अर्पण व सत्कार सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शहा परिवार व उपस्थित युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.