हर्षवर्धन पाटील यांचा उद्याच्या ७ ऑक्टोबरला शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तुतारीत प्रवेश!
इंदापूर (प्रतिनिधी): भाजपच नेते हर्षवर्धनपाटील यांनी ” सिल्व्हर ओक .”वरील भेटीनंतर राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.तसेच कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण हा पक्ष प्रवेश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत खुद्द जयंत पाटील यांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थित इंदापूर येथे सोमवारी ७ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता इंदापूर जुनी कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान येथे हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले.