हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील शिवरायांच्या चरणी नतमस्तक
हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांच्याहस्ते छञपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पूर्णाकृती पुतळ्याचे बावडा येथे अनावरण
जय शिवाजी! जय भवानी! च्या घोषणाने बावडा परिसर दुमदुमला!
शिवरायांची आरती मोठ्या आनंदाने झाली
इंदापूर(बावडा):दसऱ्याच्या मुहूर्तावर श्री .शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा येथे शाळेच्या प्रांगणात भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मा.सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांच्या शुभहस्ते झाले.
पाटील म्हणाले की, आपल्या आजवरच्या आयुष्यातील हा अतिशय मोलाचा सुवर्णक्षण आहे. हा आपण कधीच विसरू शकणार नाही.सदरचा अश्वारूढ पुतळा पूर्ण ब्राँझ धातूचा असून त्याचे वजन तब्बल दोन टन इतके आहे. आणि त्याच्या उभारणीसाठी ४ टन वजन झेपेल इतकी क्षमता असलेला चबुतरा बांधण्यात आला आहे.तसेच पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी आपण निधी उभारू पण भव्य दिव्य स्मारक उभे करू.आपल्यासाठी गर्वाची व अभिमानाची बाब आहे.सदरचा पुतळा बावडा गावच्या ग्रामस्थांच्या मदतीने बसविण्यात आला असून हा पुतळा गावातील सर्व ग्रामस्थांना सदैव खुला राहील असे हर्षवर्धन पाटील यांनी अभिवचन या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिले. या पुतळ्याचे आयुष्य तब्बल एक हजार वर्षांचे असून त्याला काहीही होणार नाही,असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.
येत्या काही श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा येथील शालेय परिसराचा कायापालट केला जाईल आणि नवीन शैक्षणिक हब निर्माण केले जाईल.यानंतर शिवव्याख्याते लक्ष्मण आसबे यांनी शालेय विद्यार्थ्यांना व उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. महाराजांच्या आयुष्यातील अनेक साहसी कथा सांगितल्या. तसेच महाराजांप्रमाणे सर्व धर्म भावना ठेऊन गुण्यागोविंदाने एकत्र राहण्याचा सल्ला दिला.
गावातील तब्बल ३१ जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. अशोक घोगरे यांचे भाषण झाले.तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पवन घोगरे यांनी केले.
ग्रामस्थांच्या वतीने पाटील दाम्पत्याचा यथोचित सत्कार करण्यात आला.स्टॅच्यू मेकर श्री व सौ.यादव दाम्पत्याचा ग्रामस्थांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी बावडा ग्रामस्थांनी आपली हजेरी दर्शवली.