हर्षवर्धन पाटील यांची निमगाव केतकी येथील महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेस भेट – कुस्तीगीरांना दिल्या शुभेच्छा!

इंदापूर : प्रतिनिधी दि.१३/१०/२३

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निमगाव केतकी येथे इंदापूर तालुका कुस्तीगीर संघाच्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेस शुक्रवारी (दि.१३) सकाळी भेट देऊन आखाड्यामध्ये हनुमान मूर्तीचे पूजन करून स्पर्धेचा शुभारंभ केला. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी कुस्तीगीरांना शुभेच्छा दिल्या.

 यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्याला कुस्तीची उज्वल परंपरा आहे. इंदापूर तालुक्यातील लाल माती कुस्तीसाठी पोषक अशी आहे. इंदापूर तालुक्यातून महाराष्ट्र केसरी किताब विजेता पैलवान तयार व्हावा.

 इंदापूर येथे जानेवारी २००६मध्ये आपण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते, अशी आठवण हर्षवर्धन पाटील यांनी सांगितली. इंदापूर तालुक्यात कुस्तीच्या वाढीसाठी, कुस्तीगिरांसाठी सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली. या चाचणी कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व कुस्तीगिरांचे स्वागत करीत हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी तुषार जाधव, पै.सचिन जाधव व त्यांच्या टीमचे उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक केले. यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव यांचेसह कुस्तीगीर संघ इंदापुर तालुका अध्यक्ष पै.अशोक चोरमले, उपाध्यक्ष पै. सचिन बनकर, सदस्य पै. योगेश शिंदे, पै. संतोष पिसाळ, पै. अस्लम मुलाणी, पै.हनुमंत रेडके,पै. शशिकांत सोनार, पै. कुंडलिक कचरे, पै.युवराज नरुटे, पै. पोपट शिंदे, पै. हनुमंत पवार, पै. सद्दामहुसेन जमादार, पै. गोपाळ वाबळे तसेच निमगाव केतकी येथील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!