हर्षवर्धन पाटील लोकप्रियतेच्या शिखरावर! मात्र त्यांना तूतारीसाठी जनतेकडून हिरवा कंदील?
हर्षवर्धन पाटील लोकप्रियतेच्या शिखरावर! मात्र त्यांना तूतारीसाठी जनतेकडून हिरवा कंदील?
इंदापूर (प्रतिनिधी): मा. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा काल वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाला. शहाजीनगर निरा भीमा सहकारी साखर कारखाना व इंदापूर शहरातील राधिका लॉनस येथे नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. आणि शुभेच्छांचा वर्षाव करत होते. आलेल्या सर्व नागरिक भरभरून प्रतिसाद देत होते.
हर्षवर्धन पाटील धुरंदर राजकारणी आहेत.त्यांच्याकडे संयम असल्याने येणाऱ्या २०२४ च्या विधान सभेत त्यांना निश्चित यश मिळेल असा विश्वास जनतेने व्यक्त केला आहे.यातच तुतारीकडून त्यांच्या नावाची चर्चा तालुकाभर आहे. जरी त्यांनी या विषयाला छेद दिला असला तरी सामान्य नागरिकांकडून मात्र याला केंव्हाच हिरवा कंदील मिळाला आहे.
जर हर्षवर्धन पाटील तुतारीकडून उभा राहिले तर ते विक्रमी मतांनी निवडून येतील अशी तालुक्यातून आणि जन सामन्यातून चर्चा चालू आहे.हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील व कन्या अंकिता पाटील ठाकरे हे देखील आपल्या वडीलांसाठी रात्रं दिन परिश्रम घेत आहे.
हर्षवर्धन पाटील यांचा वाढता जनसंपर्क त्यांच्यासाठी सकारात्मक परिणाम घडवून आणणार हे मात्र निश्चित .परंतु हर्षवर्धन पाटील यांच्या निर्णयाकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. ते महायुतीत राहणार का ?
का हाती तुतारी घेऊन विजयाचा बिगुल वाजवणार का? हे मात्र काळच उत्तर देईल.