कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर आणि डिस्ट्रिक्ट लिनेस क्लबच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

इंदापूर (प्रतिनिधी):कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर आणि डिस्ट्रिक्ट लिनेस क्लबच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला जोपासणाऱ्या वीस गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा जयश्री गटकुळ यांनी केले.

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षिय भाषणातून “शिक्षणाचा उपयोग आयुष्य – समाज परिपूर्ण करण्यासाठी, देशासाठी काहीतरी करण्यासाठी केला पाहिजे. शिक्षण, ज्ञान याला कर्तुत्व – नेतृत्वाची जोड दिली तर आयुष्यात माणूस यशस्वी होतो” असे मत व्यक्त करीत सर्व विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळचे सचिव ॲड. मनोहर चौधरी यांनी विद्यार्थी जीवनात ज्ञानार्जन करताना , ज्ञान,आत्मविश्वास, जिद्द याबरोबर मैत्री,आपलेपणा असेल तर जगणं सोपं होतं” असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय सुरवशे, श्रुतिका सोलापूर यांनी केले

शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला जोपासणाऱ्या वीस गुणवंत विद्यार्थ्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.सर्व पाहुण्याचे स्वागत रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा जयश्री गटकुळ यांनी केले कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.जीवन सरवदे, ॲड. मनोहर चौधरी, संस्थेचे संचालक विलास बापू वाघमोडे, ॲड. कोठारी, डॉ शिवाजी वीर, उज्वला गायकवाड लिनेस क्लब डिस्ट्रिक्ट सचिव, लिनेस कल्पना भोर

लिनेस क्लब डिस्ट्रिक्ट खजिनदार , जयश्री खबाले शहा महादेव नगर लिनेस क्लब अध्यक्षा ,रतन पाडूळे, डॉ.एम. पी.शिंदे डॉ. आर आर भोसले, प्रा मोनिका भुजबळ, प्रा श्वेता खोपडे, प्रा.प्रशांत साठे, प्रा.उत्तम माने अन्य मान्यवर उपस्थित होते संतोष अहीवळे, शितल गोटे, दिव्या जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय जाधव, विश्र्वराज गटकूळ, शंकलेश चव्हाण, लखन कदम, उमेश केचे, लहू कारंडे अक्षय गायकवाड, निकिता मखरे, ऋतुजा शिंदे,भारती डोके, पुनम साडेकर यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार सचिन खरात यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!