प्रभाग १० मध्ये राजकीय खळबळ : नगरसेविका सौ. राजश्री मखरे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात सक्रिय! आपण कुठेही जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रभाग १० मध्ये राजकीय खळबळ : नगरसेविका सौ. राजश्री मखरे पुन्हा सक्रिय
प्रदीप गारटकर यांच्या बालेकिल्ल्यात भूकंपाची चाहूल?
इंदापूर :इंदापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. प्रभागातील विद्यमान नगरसेविका सौ. राजश्री अशोक मखरे यांनी अखेर आपले मौन सोडत पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची स्पष्ट भूमिका जाहीर केली असून, त्या पुन्हा पूर्ण क्षमतेने सक्रिय झाल्या आहेत.
राजश्री मखरे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या प्रदीप गारटकर यांच्या विश्वासू नगरसेविका म्हणून ओळखल्या जात होत्या. मात्र, अलीकडील राजकीय घडामोडींमध्ये कृष्णा-भीमा विकास आघाडीने त्यांना नकार दिल्यामुळे त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. परिणामी त्यांनी काही काळ कोणत्याही बाजूने भूमिका न घेता स्थिर राहणे पसंद केले.
प्रदीप दादांनी त्यांच्या नाराजीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कोणतीही भूमिका न घेता पक्षाशी निष्ठा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. अखेर आज त्यांनी मौन सोडत “गारटकर यांच्या सोबत नाही, फक्त पक्षाचे काम करणार” अशी भूमिका जाहीर केली.आपण भरत शेठ शहा आणि त्यांच्या अधिकृत उमेदवारांचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्या प्रभागातून तीनही नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांना विजयाच्या दिशेने घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इंदापूर शहरातील वाढत्या राजकीय तापमानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली.
प्रदीप दादा गारटकर यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली. त्यांना माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच भाजप नेते प्रवीण माने यांची साथ दिली. त्यामुळे त्यांनी कृष्णा-भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून २० नगरसेवक व १ नगराध्यक्ष अशा भक्कम संघासह निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
प्रभाग १० मध्ये बदलते समीकरण
राजश्री मखरे या पुन्हा प्रभागात सक्रिय झाल्यामुळे, “प्रभाग क्रमांक १० मधील गारटकरांचा बालेकिल्ला ढासळणार का?” हा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
त्यांच्या सक्रियतेने कोणाला धक्का बसणार आणि याचा निवडणुकीवर कसा परिणाम होणार याकडे संपूर्ण इंदापूरचे लक्ष वेधले गेले आहे.
इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधील ही घडामोड आगामी राजकीय समीकरणांना मोठा कलाटणी देणारी ठरणार असून, येणारे काही दिवस अतिशय निर्णायक राहणार आहेत.
