इंदापूर नगरपालिका निवडणुका पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात संपन्न !
इंदापूर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इंदापूर शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज वाघ पॅलेस येथे सकाळी ११. वा. उत्साहाच्या वातावरणात पार पडली.
या बैठकीस इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत आबा कोकाटे, इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, महिला शहराध्यक्षा उमाताई इंगोले, तसेच आजी-माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत इंदापूर शहरातील चालू विकासकामे, आगामी महत्त्वपूर्ण प्रकल्प, तसेच संघटनात्मक अडचणी आणि नागरिकांच्या विविध वैयक्तिक समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय, पदवीधर मतदारसंघ नाव नोंदणी अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे बैठक अत्यंत यशस्वी आणि ऊर्जावान वातावरणात संपन्न झाली. स्थानिक विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंदापूर शहर व तालुका पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठा व्यक्त करत श्री. प्रदीपदादा गारटकर, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – इंदापूर यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात संघटन बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.