Thursday, January 15, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

इंदापूर नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी स्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई करावी – कीर्तीकुमार वाघमारे

इंदापूर – इंदापूर शहरातील स्वच्छतेच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीने नगरपरिषदेकडे निवेदन दिले आहे.

आंबेडकर नगर परिसरातील पश्चिम बाजूस, ज्योतीबा देवस्थानाजवळील रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे साचले असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक, विशेषतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती, आजारी पडत असल्याची तक्रार वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष कीर्तीकुमार वाघमारे यांच्याकडून करण्यात आली आहे.

वाघमारे यांनी निवेदन देत नगरपरिषदेला तातडीने स्वच्छतेची व्यवस्था सुधारण्याची मागणी केली. “इंदापूर शहर १००% स्वच्छतेकडे वाटचाल करावे, यासाठी नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण महत्त्वाचे आहे. आंबेडकर नगरातील कचरा तातडीने उचलून परिसर स्वच्छ ठेवावा,” अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

नगरपरिषदेने या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून संबंधित विभागाला त्वरित स्वच्छतेचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत “अशा प्रकारच्या त्वरित कारवाईमुळे शहर अधिक सुंदर आणि निरोगी बनेल,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच त्या परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करावी असे ही अवाहान त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!