Wednesday, December 10, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

इंदापूर नगरपालिका निवडणूक २०२५ : वंचित बहुजन आघाडीचा प्रचार वेगात

इंदापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी प्रचाराला वेग देत असून, नगराध्यक्ष पदासाठीच्या स्पर्धेत अनेक उमेदवार मैदानात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कृष्णा-भीमा विकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांनीही प्रचार कार्यास सुरूवात केली आहे.

या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून किर्तीकुमार वाघमारे यांच्या नावाची घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घर-घर जाऊन प्रचार सुरू केल्याचे दिसून येत असून, दहा प्रभागांमध्ये प्रचार उपक्रम राबविले जात आहेत. विविध प्रभागांतील मतदारांनी आयोजित प्रचार रॅलींना प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.वंचित बहुजन आघाडी कडून प्रचारासाठी पारंपारिक सायकलीचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे या प्रचाराचे माध्यम सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. घरोघरी जाऊन पायी असलेला प्रचार लक्षवेधी ठरत आहे.

सध्या सर्व प्रमुख पक्षांकडून प्रचार रणनीती जोरात सुरू असून, कोणाला जनतेचा पाठिंबा मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. निकाल 3 डिसेंबर रोजी घोषित होणार असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

आपल्या प्रचार रॅलीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किर्तीकुमार वाघमारे यांनी मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!